भोसरी : विदर्भातून पुणे, पिंपरी चिचवड शहरामध्ये शिक्षणासाठी आलेल्या मुलासाठी सोय व्हावी या सामाजिक उद्देशाने २६ जानेवारीच्या मुहूर्तावर भोसरी येथे बांधण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभ्यासिका व वाचनालयाचे उद्घाटन नुकतेच आ. महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कोंग्रेसचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाने, मा. नगरसेवक सागर गवळी, विंनायताई तापकिर, विकास डोळस, कुलदीप परांडे, रामहारी अघडते गुरुजी, रामदासजी होपळ, नीलकंठ बचे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
साप्ताहिक धनगर माझा वाचण्यासाठी येथे click करा
सदर वाचनालय उदरनिर्वाहाच्या, व्यवसायाच्या निमित्ताने पुणे, पिंपरी शहरात येऊन स्थायिक झालेल्या समाज बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या राजमाता अहिल्यादेवी वैदर्भीय धनगर समाज ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नागेश वसतकार, सचिव नंदू गुरव, ओंकारराव घटाळे, गजानन वसतकार, ज्ञानेश्वर बाजोडे, वसंतराव अघडते, गजानन सोनोने, संजय होपळ, विजय दिवनाले, सज्वल पुंडे, कैलास इलामेगार, शरद बोरसे, वसंतराव वसतकार, ज्ञानेश्वर बोरसे, ज्ञानेश्वर वरप, गणेश पुंडे, रामेश्वर पुंडे, योगेश कळंब, दिलीप सोनोने यांनी प्रयत्न केले.