महाराष्ट्रतुमचे संस्कार काढले तर पळताभुई थोडी होईल, गुवाहाटी फेम आ. शहाजी पाटलांना...

तुमचे संस्कार काढले तर पळताभुई थोडी होईल, गुवाहाटी फेम आ. शहाजी पाटलांना डॉ. देशमुखांचा सणसणीत इशारा

spot_img

सांगोला : आमच्यावर आबासाहेबांचे संस्कार आहेत, ते आम्ही प्राणापणाने जपू. त्यांचा नातू असल्याचा अभिमान तर आहेच, पण त्यांच्या विचारांचा जागरही तूसभर कमी होऊ देणार नाही. तुमचे संस्कार काढले तर पळताभुई थोडी होईल, असा इशाराही शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आ. शहाजीबापू पाटील यांना दिला आहे.

जे आजोबाला जमले नाही ते नातवांना कुठे जमायचं? आमच्या नादाला लागू नका अशा बोचर्‍या शब्दात आ. शहाजी पाटील यांनी विश्वविक्रमी आमदार कै. माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी नवख्या डॉ. बाबासाहेब यांना कडक शब्दात आ. शहाजी पाटलांचा समाचार घेतला

डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, कोण किती पाण्यात आहे हे तालुक्यासह उभ्या राज्याला माहीत आहे. स्व.आबासाहेबांवर टीका करण्याची विद्यमान आमदारांची पात्रता नाही. स्वच्छ, निर्मळ प्रतिमेचे लोकप्रतिनिधी म्हणून आबासाहेबांची देशभर ओळख आहे. त्यामुळे आमचं गणित घालायच्या भानगडीत पडू नका असे देशमुख म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत जनताच तुमचा हिशोब करेल, शिवाय गेल्या ३० वर्षांपासून अशा हिशोबावरच त्यांची गुजराण केल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले. अशा हिशोबातूनच १९९९ मध्ये  जेलवारीही करून आला आहात. तसेच अशा प्रकारचे हिशोब घालूनच तुम्ही तालुक्यातील असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांची राखरांगोळी केल्याचे देशमुख म्हणाले. त्यामुळे हिशोब, गणित घालायच्या भानगडीत पडू नका, असा सणसणीत इशारा देशमुख म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...