महाराष्ट्रशेवटी मुख्यमंत्र्यांनीही धनगर समाजाला दगा दिलाच...!

शेवटी मुख्यमंत्र्यांनीही धनगर समाजाला दगा दिलाच…!

spot_img

नवी दिल्ली : महाराष्ट्र-झारखंड निवडणुकीच्या तारखांची केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. तसेच वायनाडसह 13 राज्यांच्या 3 लोकसभा आणि 49 विधानसभा जागांवर पोटनिवडणूकीची देखील घोषणा निवडणूक करण्यात आली.

            महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

                        पण या सगळ्या आगोदर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला 15 दिवसात एसटी आरक्षणाचा GR काढतो म्हणून मंत्रालयाच्या बैठकीत सांगितले होते. ज्या दिवशी शब्द दिला त्या दिवसापासून मुख्यमंत्र्यांनी अनेक बैठका घेतल्या रातरात जागून हजारो GR काढले, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या हक्काच्या ST आरक्षण अंमलबजावणी बाबत निर्णय न घेता शेवटी मुख्यमंत्र्यांनीही धनगर समाजाला दगा दिलाच. असा सुर काढत तीव्र संताप व्यक्त होताना दिसून येत आहे.

      धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी 20 – 20 दिवस उपोषणे केली. उपोषनकर्त्यांचे जवळपास मुडदे पडण्याची वेळ आली होती पण या सरकारला धनगर समाजाचा प्रश्न सोडवावा असे न वाटल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला.

            यामुळे आता होणार्‍या निवडणुकीमध्ये धनगर समाज काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...