पणजी: महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास, पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री, मा. डॉ. आण्णासाहेब डांगे (आप्पा) यांना गोवा येथे गोवा राज्याचे पर्यावरण मंत्री मा. ना. श्री. शिक्वेरा साहेबजी यांच्या शुभहस्ते अतिशय प्रतिष्ठीत व मानाचा “महाराष्ट्राचे शिल्पकार, शिक्षण महर्षी” हा सर्वोच्छ पुरस्कार बहाल करून सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. यावेळी इस्लामपूरचे नगरसेवक, युवक नेते मा. श्री. विश्वनाथ डांगे (बापू) उपस्थित होते.
मा. डॉ. श्री. आण्णासाहेब डांगे (आप्पा) यांना आज अखेर उत्कृष्ट संसदपटू, शिक्षण रत्न, जीवन गौरव, पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापिठाची डॉक्टरेट, शिक्षण भुषण, इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँन्ड रिसर्च असोशिएशन चा इंडियन लीडरशिप अँवार्ड, जन स्थान यासह अनेक महत्वपूर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सहकार क्षेत्रात आदर्शवत अशी दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी कार्यक्षम पणे कार्यरत असुन संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात एक आधुनिक क्रांतीच करून दाखविली आहे. शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन आजही हाजारो कुटुंबीयांचे वर्तमान व भविष्य साकारले जात आहे. चौंडी ता. जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगांव चौंडी हे पर्यटनस्थळ निर्माण केले असुन त्यांना चौंडी विकासाचे शिल्पकार म्हणून गौरविण्यात आले आहे. आदरणीय डांगे साहेब हे राज्य व्यापी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ या संघटनेचे संस्थापक, मार्गदर्शक असुन महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात या संघटनेची भक्कमपणे उभारणी करून रचनात्मक बांधणी केलेली आहे. आज या महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे हे समर्थपणे उत्तम कार्यभार पहात आहेत.
मा. डॉ. आण्णासाहेब डांगे (आप्पा) यांनी संघजीवन गाथा, कळलं का ?, समजलं का ?, नवरत्ने, गित अहिल्यायन व बिल्वदल, कुलस्वामीनी मायाकादेवी, सुभद्रा, माझे मत, यासह अन्य पुस्तकांचे लेखन, होळकर शाहीच्या राज्यकर्त्यांच्या चित्रांचा अल्बम, अहिल्यादेवींचा पोवाडा, व गीत अहिल्यायन संगीतबध्द करून कॅसेट व सी. डी. ची निर्मीती केली आहे.
मा. डॉ. श्री. आण्णासाहेब डांगे (आप्पा) यांना अतिशय प्रतिष्ठीत व मानाचा “महाराष्ट्राचे शिल्पकार, शिक्षण महर्षी” हा सर्वोच्छ पुरस्कार गोवा येथे सन्मानपूर्वक बहाल केल्याबद्दल महाराष्ट्रातील अनेक राजकिय, समाजिक, शैक्षणीक, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे तसेच समाज बांधव, कार्यकर्ते, राज्यातील निरनिराळ्या संघटना व राजकिय पक्षांच्या पदाधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियावर, दूरध्वनीवरून अभिनंदन होत आहे.