छत्रपती संभाजीनगर: आरक्षणात आडवा येणारा महत्त्वाचा मुद्दा निकाली निकाली काढण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील एकाच कुटुंबाने धनगड जातीचे दाखले काढले होते. मात्र, आज सरकारने धनगड जातीचे हे दाखले रद्द केले आहे.
राज्यात धनगड जातीचे सहा दाखले रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्यातला धनगड आणि धनगर वाद मिटला आहे. धनगड जात नसूनही राज्यात धनगड जातीचे 6 दाखले देण्यात आले होते. मात्र हे दाखले बोगस असल्याचा आरोप धनगर समाजाकडून करण्यात आला होता. आता हे दाखले रद्द केल्याने धनगड आणि धनगर वाद मिटला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्य सरकारने धनगड समाज राज्यात अस्तित्वात नसल्याचं लिहून दिलं असतानाही संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात 6 धनगड जातीचे दाखले देण्यात आलेले होते. जात पडताळणी समितीला हे दाखले दिल्या नंतर रद्द करण्याचा अधिकार नाही. मात्र धनगर समाजाने मागणी लाऊन धरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जात पडताळणी समितीला आदेशीत करून हे खोटे दाखले रद्द करण्यास सांगितले. त्यानंतर आता हे सहा धनगड जातीचे दाखले रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील धनगड आणि धनगर वाद संपुष्टात असल्याचं बोललं जात आहे.