पुणे : मुखेड मतदारसंघातील काँग्रेसचे नेते यशपाल भिंगे यांचे तिकीट पक्षाने कापल्याने धनगर समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या नाराजीचे पडसाद सोशल मीडियावर उमटताच कॉंग्रेस पक्षाने दखल घेत धनगर समाजातील जय मल्हार सेनेचे संस्थापक तथा मेंढपाळ नेते लहू शेवाळे यांना छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली. यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे विद्यमान मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात कॉंग्रेसचे लहू शेवाळे ही लढत होणार असल्याने अनेकांचे लक्ष याकडे लागले आहे.
या उमेदवारीसाठी लहू शेवाळे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली नव्हती. तरीही प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा फोन करून, निवडणुकीसाठी तयार आहे का, अशी दुपारी विचारणा केली. शेवाळे यांनी होकार देताच रात्री काँग्रेसच्या यादीत त्यांचे नाव आले.
धनगर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसने छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून एम. के. देशमुख यांची उमेदवारी रद्द केली.