मुंबई (धनगर माझा) : सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावचे सुपुत्र श्री संजय देवकाते यांनी एका मिनिटात मोस्ट नकल पुश अप्सचा नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे. त्यांनी एका मिनिटात १२१ नकल – पुश अप्स मारून ११८ नकल पुष्प चा पूर्वीचा विक्रम मोडला आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
संजय देवकाते हे भारतीय नौसेनेत हवालदार म्हणून गेल्या सहा वर्षापासून कार्यरत आहेत. दिनांक १७ मार्च रोजी मुंबई येथे हा उपक्रम संपन्न झाला. त्यानंतर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड समितीने काल सदर निर्णय जाहीर केला. त्यामुळे हवालदार संजय देवकाते यांच्यावर संपूर्ण देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.