पुणे : कुस्ती स्पर्धेतील अत्यंत मानाचा राष्ट्रीय स्तरावरील हिंदकेसरी किताब महाराष्ट्राच्या मल्हारश्री पैलवान समाधान वाघमोडे पाटील याने पटकावला आहे. त्यामुळे त्याचे संपूर्ण देशातून अभिनंदन होत आहे. तेलंगणा येथे झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत समाधान वाघमोडे पाटील याने मैदान मारले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पैलवान समाधान पाटील हा 2024 सालचा हिंदकेसरी ठरला आहे. समाधान पाटील यांनी दिल्लीचा मल्ल बोलू खत्री याचा पराभव करत हिंद केसरीवर आपले नाव कोरले. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा हि हिंदकेसरी स्पर्धा आहे.
समाधान पाटील शेतकरी कुटुंबातील समाधान पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहे. यावर्षीचा हिंदकेसरी मोहोळ तालुक्यामध्ये मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.