महाराष्ट्रअभिनंदन : राज्यशासनाच्या मानाच्या ४७ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये २ मेंढपाळ सुपुत्रांचा...

अभिनंदन : राज्यशासनाच्या मानाच्या ४७ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये २ मेंढपाळ सुपुत्रांचा समावेश

spot_img

मुंबई : राज्यशासनाच्या मानाच्या ४७ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये गोल्डन बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला नेमबाज रुद्राक्ष पाटील व हॉकीतील स्टार खेळाडू अक्षता ढेकळे या २ मेंढपाळ सुपुत्रांना जाहिर झाल्याने त्यांच्यावर विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसून येत आहे,

          भारताचा दिग्गज नेमबाज रुद्राक्ष पाटील व हॉकीतील स्टार खेळाडू अक्षता ढेकळे यांना राज्य शासनाचा 2022-23 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य सरकारनं गुरुवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केले. यात ही घोषणा करण्यात आली.

          रुद्राक्ष पाटील हा मूळचा माळशिरस तालुक्यातील असून एशियन गेम्समध्ये त्याने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे भारतानं या स्पर्धेतलं पहिलं गोल्ड मेडल जिंकलं होत .

          अक्षता ढेकळे ही हॉकीतील स्टार खेळाडू आहे. ती मुळची वाखरी ता. फलटण येथील आहे. हॉकी महिला वर्ल्डकपमध्येही तिने सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेत पदार्पण करणारी महाराष्ट्रातील पहिली खेळाडू म्हणून तिची ओळख आहे.  

रुद्राक्षचे वडील बाळासाहेब पाटील हे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तर आई आरटीओ अधिकारी आहे. तसेच अक्षताचे आईवडील दोघेही शेती करतात.

धनगर माझा परिवाराच्या वतीने संपादक धनंजय तानले यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.

यासोबतच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू अविनाश साबळे, दीप रामभीया, निलम घोडके, संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, आदित्य मित्तल, शुशिकला आगाशे, प्रतिक पाटील, कशीश भराड, गिरीश काते, कुणाल कोठेकर, जान्हवी जाधव, अक्षय तरळ, रुपाली गंगावणे, चितारा विनेरकर, रुद्रांक्ष पाटील, याश्वी शाह, सुह्रद सुर्वे, दिया चितळे, श्रेयस वैद्य, श्रुती कडव, सर्वेश मेनन, सिद्धांत मोरे, पूनम कैथवास, रेनॉल्ड जोसेफ, अक्षता ढेकळे, अपूर्वी पाटील, अंकित जगताप, पंकज मोहिते, प्रियंका इंगळे, सुयश गरगटे, अक्षया शेडगे, धर्मेंद्रकुमार यादव, कोमल वाकळे, नंदिनी साळोखे, कल्याणी जोशी, विष्णू सर्वानन, वैष्णवी पाटील, श्रीधर निगडे, श्रेया नानकर, साहिल खान, नेहा देशमुख, जयेश मोरे, पूर्वा किनरे आणि नितिन पवळे या सर्वांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...