पुणेअभिनंदन : MPSC च्या अंतिम गुणवत्ता यादीत धनगर समाजाच्या १०० उमेदवारांचा...

अभिनंदन : MPSC च्या अंतिम गुणवत्ता यादीत धनगर समाजाच्या १०० उमेदवारांचा समावेश

spot_img

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात बांगर हनुमंत ज्योतीराम यांनी ५८४.२५ राज्यात २९ वा तर एनटी सी मधून पहिला क्रमांक मिळवला आहे. तर मुलींमधून शामा अनुसे हिने ५६१.५० गुण मिळवून राज्यात २१२ वा तर एनटी सी मधून मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. आतापर्यंतची राज्यसेवेची सर्वात मोठी म्हणजे ६१३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

विशेष म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम १८३० उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते. या उमेदवारांच्या मुलाखतीचा शेवटचा टप्पा हा गुरूवारी पार पडला आणि त्याच दिवशी संध्याकाळी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांवर त्यांच्या मित्र, आप्त, नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसून येत आहे. उत्तीर्ण झालेल्या १००  उमेदवारांची यादी लवकरच धनगर माझावरून प्रसिद्ध करण्यात येईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...