ब्रेकिंगसावधान : धनगर समाजाच्या गुणवंतांचे भवितव्य धोक्यात; हिंद केसरी पै. समाधान वाघमोडे...

सावधान : धनगर समाजाच्या गुणवंतांचे भवितव्य धोक्यात; हिंद केसरी पै. समाधान वाघमोडे पाटीलवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

spot_img

मोहोळ : कुस्ती क्षेत्रातील सर्वात नामांकित कुस्ती एका धनगराच्या पोराने जिंकल्याने मिळालेला  नावलौकिक प्रस्थापितांच्या पचणी न पडल्यानेच माथेफिरूला पुढे करून माझ्यावर खोटा अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे माझ्यासह धनगर समाजाच्या विविध क्षेत्रातील गुणवंतांचे भवितव्य धोक्यात येणार आहे.  अशी प्रतिक्रिया हिंद केसरी पैलवान समाधान वाघमोडे पाटील यांनी धनगर माझाशी बोलताना दिली आहे.

      हिंद केसरी भारत २०२४ चा विजेता तथा कुस्ती क्षेत्रात प्रचंड नाव कमवलेले हिंद केसरी पैलवान समाधान वाघमोडे पाटील (रा.नजीक पिंपरी, ता. मोहोळ) याच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंद कायदा, अंतर्गत कामती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण

वडदेगांव येथील प्रमोद आठवले यांनी यांची वडदेगांव हद्दीत फॉरेस्ट क्षेत्रात सरकारकडून मिळालेली पाच एकर जमीन असून या जमिनीतून नदीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावरून आपणास नदीतील वाळू काढण्यासाठी ये-जा करू दे, असे समाधान पाटील म्हणत होता. परंतु, आपण येथून

रस्ता देऊ शकत नाही, असे प्रमोद आठवले यांनी सांगितले होते. दरम्यान, २२ एप्रिल रोजी मोहोळच्या इब्राहिम शेख यांनी प्रमोद आठवलेंना ताकमोगे यांच्या बेगमपूर येथील हॉटेल मध्ये भेटण्यासाठी बोलवले. तिथे समाधान पाटील हा ही होता. तिथे पुन्हा एकदा मला रस्ता का देत नाही, असे म्हणून पै. समाधान पाटील याने प्रमोद आठवले यांना जातीवाचक शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने मारहाण करुन खाली पाडून तोंडावर चापटा मारून बोटातील अर्धा तोळ्याची अंगठी काढून घेऊन निघून गेला, अशा आशयाची फिर्याद कामती पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.

सदरचे प्रकरण संपूर्णतः बनावट असून याबाबत पोलिस अधिकार्‍यानी फिर्यादीचे सर्व प्रकारचे कॉल (CDR) चेक करावे व या प्रकरणामागचा खरा सुत्रधार शोधून काढावा अशी मागणी समाधान पाटील यांनी केली आहे.

धनगर समाजाने वेळीच सावध होण्याची गरज

सद्या राज्यात लोकसभेच्या वातावरणाने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये विशेषतः माढा लोकसभा मतदार संघ आघाडीवर आहे. या मतदार संघात जागृत झालेल्या धनगर समाजाच्या अस्तित्वाला पूर्वी कधी नाही तेवढी प्रसिद्धी प्रामाणिकपणे प्रस्थापित मीडियाने दिली. त्यामुळे भविष्यात प्रस्थापिताना स्थानिक पातळीवर तयार होणार्‍या स्पर्धकांचा बीमोड करण्याच्या उद्देशाने सदर कांड रचले असल्याचे बोलले जात आहे.

अशा प्रकरणात धनगर समाजाने पक्ष, संघटना, स्थानिक गट तट सोडून रस्त्यावर येऊन एकजुटीची ताकत दाखविणे गरजेचे आहे.

आत्तापर्यंत ज्या ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यातील कांहीजणांना राज्य किंवा केंद्र शासनाने वर्ग १, किंवा २ अधिकारी म्हणून शासकीय सेवेत घेतले तर कांहीजन राजकरणात आले आहेत. त्यापैकीच समाधान वाघमोडे हा सुद्धा होऊ शकतो याच कूटनीतीने प्रस्थापितांनी हा डाव रचला तर नसेल ना हे पहावे लागणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...