मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्र.५६ मधील शिफारशींनुसार महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती क च्या यादींमध्ये नव्याने एका जातीचा समाविष्ट करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ०६ ऑगस्ट, २०२४ रोजी जारी केला आहे.
आयोगाच्या शिफारशीनुसार “ठेलारी” ही जात महाराष्ट्र शासनाच्या ‘भटक्या जमाती (ब) यादीतील अ.क्र. २७ येथून वगळून ‘भटक्या जमाती (क) यादीतील अ.क्र. २९ मध्ये धनगर या जातीची तत्सम जात म्हणून समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालनुसार “ठेलारी” जातीचा भटक्या जमाती (क) प्रवर्गात समावेश करण्याबाबत सखोल पडताळणीअंती शासनास अभिप्राय सादर केले होते. सदर प्रकरणांबाबतची वस्तुस्थिती व गुणवत्ता विचारात घेऊन खालील तक्त्यात नमूदप्रमाणे शासन मान्यता देण्यात आल्याचे शासन आदेशात म्हटले आहे.
ठेलारी हे धनगर जमातीतील असून मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये NT B मध्ये समावेश केला गेला होता. सुमारे १५ वर्षापासून NT C मध्ये समावेश करावा म्हणून मागणी करत होते.