ब्रेकिंगधनगर आरक्षणासाठी मंत्रालय आणि विधानभवनावर घेराव घालण्याचा प्रयत्न

धनगर आरक्षणासाठी मंत्रालय आणि विधानभवनावर घेराव घालण्याचा प्रयत्न

spot_img

मुंबई : यशवंत सेनेकडून आरक्षणासाठी मंत्रालय आणि विधानभवनावर घेराव घालण्याची तयारी केली जात असतानाच मुंबई पोलिसांनी धनगर समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांना अटक केली.

     धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकडे कालच कूच केली होती. सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचे हजारो कार्यकर्ते आणि १ हजारहून अधिक गाड्यांच्या ताफा मुंबईत आज दाखल झाला. त्यावेळी मुंबई पोलिसांनी पोलिसांनी पी डिमेलो रोडवर गाड्यांचा ताफा अडवला व सदर कारवाई केली आहे. ‘सात दिवसाआधी आम्हाला आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसण्याची परवानगी देण्यात आली होती. पण आता अडवले जात असल्याचे’, धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी म्हटले आहे.  यावेळी पोलिसांनी हा ताफा अडवल्याने यशवंत सेनेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक दिसून आले. तसेच त्यांच्याकडून रस्त्यावर बसून घोषणा देण्यात आल्या.

‘राज्य सरकराने मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावला पण धनगर समाजचा प्रश्न मार्गी न लावल्याने धनगर समाजाच्या तोंडाला सरकारने पाने पुसल्याचा आरोप ही दोलतोडे यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...