मुंबई : धनगर समाजाची तत्सम जमात असलेल्या ठेलारी समाजाला मागास प्रवर्गाच्या एन टी ब मधून एनटी क मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने आज घेतला असून तसा जीआर काढला. यामुळे तब्बल २५ ते ३० वर्षापासून चालू असलेल्या ठेलारी समाजाच्या संघर्षाला न्याय मिळाला. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचा ठेलारी समाजाने मंत्रालयात पेढे आनंद उत्सव साजरा केला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले. तसेच पद्मश्री तथा मा. खा. डॉ. विकास महात्मे, मा. मंत्री अतुलजी सावे , माननीय मंत्री संजयजी बनसोडे या सर्वांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष आनंद बनसोडे, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी, ठेलारी समाजाचे नेते विठ्ठल भाऊ मारणार, बाबासाहेब दगडे, संदीप माने, वामनराव मारणार, पावा गोवेकर, देवा गोयकर, बापू कोळपे, गोपाल सोनू, लक्ष्मण शिंदे, राजू पाल आदीजन उपस्थित होते.