मुंबई : प्रत्येक कार्यात प्रत्येकालाच सिंहाचा वाटा उचलता येणे शक्य नसतं; परंतू आपापल्यापरीने त्यात सामील होत खारूताईचा वाटा होणे शक्य असते. या उक्तीला अनुसरून गेली अनेक वर्षे भागोजी चॅरिटेबल ट्रस्ट रजि. मुंबई वतीने प्रति वर्षी समाजशील उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्रतिवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी रविवार दि.२८ जानेवारी २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, चर्चगेट – मुबंई येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी ज्येष्ठ समाज नेते राजू जांगळे, जयसिंगतात्या शेंडगे, बृहन्मुंबई महानगरपालिका मा. उपयुक्त लक्ष्मण व्हटकर, सामाजिक कार्यकर्ते अशोकजी जंगले, अशोक डफले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निवेदक राम जांगळी यांनी सामजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांची अनुभवलेले भयानक, रोमांचक समाजाला दिशा देणारी मुलाखत घेतली तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री. धोंडू उर्फ अण्णासाहेब गोरे, उदय दणदणे, दिनेश सावंत, ऍड-भक्ती कोकरे, कु. अनिकेत धनावडे, कु. शेखर झोरे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच माहेरवाशींनीचा हळदीकुंकू सोहळा या प्रसंगी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक राम जांगळी यांनी केले तर संस्थेचे सचिव अनंत देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.