महाराष्ट्रआवश्य वाचा : 5 लाखांपर्यंत प्रत्येकजण या योजनेचा लाभ घेवू शकता

आवश्य वाचा : 5 लाखांपर्यंत प्रत्येकजण या योजनेचा लाभ घेवू शकता

spot_img

केंद्र सरकारने पंतप्रधान जन-आरोग्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना  सुरुवात केली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते. चांगल्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने देशातील प्रत्येक वर्गाच्या नागरिकांसाठी खास योजना अनेक योजना आणल्या आहेत.त्यापैकि ही एक आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करता येईल. केंद्र सरकारने ही योजना 23 सप्टेंबर, 2018 रोजी सुरु केली होती. या योजनेत किरकोळ उपचारापासून शस्त्रक्रियेचा लाभ घेता येतो.   या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेता येतो. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत सरकार त्यांचा खर्च करते. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रियासुद्धा अत्यंत सोपी आहे.

या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज करता येईल. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत सरकार त्यांचा खर्च करणार. या योजनेत सर्व कुटुंबातील सदस्यांना वयानुसार योजनेचा लाभ मिळतो. आयुष्यमान योजना ही कॅशलेस योजना आहे. उपचारासाठी एक रुपया पण द्यावा लागणार नाही.

या योजनेसाठी पात्रता

आयुष्यमान भारत योजनेचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गातील लाखो लोक घेत आहेत. या योजनेचा लाभ  निराधार, बेघर, भिकारी, मजूर, शेतकरी यांच्यासह अनेक वर्गाला घेता येईल. या योजनेसाठी काय पात्रता आहे, याची माहिती PMJAY च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर Am I Eligible या टॅबवर क्लिक करा. या पेजवर मोबाईल क्रमांक आणि राशन कार्ड क्रमांक नोंदवा. त्याआधारे काही मिनिटांतच तुम्ही योजनेसाठी पात्र आहेत की नाही, हे समोर येईल.

या कागदपत्रांची आवश्यकता

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • इनकम सर्टिफिकेट
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो

या योजनेसाठी असा करा अर्ज

  • आयुष्यमान भारत योजनेत अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • नवीन नाव नोंदणीसाठी ‘New Registration’ वा ‘Apply’ यावर क्लिक करा.
  • तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड इत्यादी माहिती नोंदवा.
  • माहिती नोंदवल्यानंतर ती पुन्हा एकदा चेक करा.
  • सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • पूर्ण अर्ज एकदा तपासा आणि सबमिट करा.
  • त्यानंतर आयुष्यमान भारत योजनेत हेल्ड कार्ड तयार होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...