धाराशिवजिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते, तिथे वादळं सुद्धा पराभूत होतात.. -...

जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते, तिथे वादळं सुद्धा पराभूत होतात.. – आ. कैलास पाटील

spot_img

बेंबळी ता.धाराशिव : जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते, तिथे वादळं सुद्धा पराभूत होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये. असे प्रतिपादन धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी बेंबळी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. बेंबळी येथील कु. क्रांती नवनाथ तानले यांची भारतीय नौदल सेना मध्ये निवड झाल्याबद्दल गावकर्यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळेस ते बोलत होते. तसेच यावेळी गणेश रावसाहेब सोनटक्के ( एस.आर.पी.एफ सोलापूर), प्रणित रामदास कोकाटे (नागपूर पोलीस), ओंकार नागेश गाजरे (PWD), बाबासाहेब महादेव गुरव (धाराशिव पोलीस), विश्वजीत शशीधर होळकर (PWD Latur), कार्तीकी तानाजी तानले (NMMS Qualify) यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..!

यावेळी कार्यक्रमास आबासाहेब गावडे, अनिल आण्णा गिरवलकर, ह.भ.प.मोहन आप्पा वाघूलकर,सत्तार भाई शेख, सोसायटी चेअरमन प्रसाद इंगळे, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुण्यश्लोक फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार उपेंद्र कटके यांनी केले तर आभार लक्ष्मण तानले यांनी मांडले.

यावेळी बेंबळी येथील बाळासाहेब माने, गोलाभाई शेख , बाळासाहेब कणसे, मोईन खान, दिनेश हेड्डा, विजय भोसले, सोमनाथ गवळी, डॉ अमोल गावडे, प्रकाश बालकुंदे, अण्णा पवार, राजाभाऊ नळेगावकर, शाम पाटील, अनिल दाणे नाना पाटील, पत्रकार अतिक सय्यद गावातील महिला, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते..

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...