पंढरपूर : ९ सप्टेंबर पासून पंढरपूर येथे धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी चालू असलेल्या उपोषणाला आज दुपारी १ वाजता राज्य सरकारचे शिष्टमंडळ भेट देणार असल्याची माहिती उपोषणकर्ते दिपक बोराडे यांनी फेसबुक द्वारे राज्यातील समाज बांधवांना दिली.
https://www.facebook.com/dipak.borhade.5/videos/865306338881804
या शिष्टमंडळात राज्य सरकारच्या वतीने मा.मंत्री चंद्रकांत पाटील साहेब, मंत्री अतुल सावे साहेब, मंत्री शंभूराज देसाई साहेब, आमदार दत्ता मामा भरणे, आमदार गोपीचंद पडळकर, याच्यासह अनेक आजी माजी आमदार , वरिष्ठ नेते आणि ईतर मान्यवर येणार आहेत.
आज उपोषणाचा ६ वा दिवस असून उपोषण कर्त्यांच्या तब्बेती ढासळल्या असून सुद्धा कालपर्यंत राज्य सरकारने कसल्याही प्रकारची विचारपूस न केल्याने धनगर समाज आक्रमक झाला आहे. जर आज यावर तोडगा नाही निघाला तर यापेक्षाही जास्त राज्यात संतापाची लाट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. असे दिसून येत आहे
