नाशिक : जिल्ह्यातील निफाड येथील सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेली निफाड विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या चेअरमनपदी शिवाजी दादा ढेपले यांची तर व्हा. चेअरमन पदी रवींद्र परदेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निफाड सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब किसनराव कापसे व व्हा. चेअरमन यांनी मुदतीत आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा निफाड तालुक्याचे सहाय्यक निबंधक कांतीलाल गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली निफाड सोसायटी कार्यालयात संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली. चेअरमन पदासाठी शिवाजी कारभारी ढेपले यांनी तर व्हा. चेअरमन पदासाठी रविंद्र परदेशी यांनी अर्ज दाखल केला.दिलेल्या मुदतीत वरील दोघांचेही प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाल्याने चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. याप्रसंगी सोसायटी संचालक अनिल कुंद्रे, भाऊसाहेब कापसे, शिवाजी धारराव, रमेश जाधव, सुभाष गाजरे, संपतराव व्यवहारे, हेमंत धारराव, सिताराम बागडे, आसिफ पठाण आदीसह माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार. स्व शांतीलाल सोनी पतसंस्थेचे चेअरमन अशोक पोपळीया श्री लक्ष्मी नागरी पतसंस्थेचे चेअरमन नंदलाल चोरडिया, नगरसेवक सागर कुंदे, देवदत्त कापसे रामदास व्यवहारे, दिलीप कापसे, दीपक कुंद्दे, मधुकर शेलार, हेमंत खडताळे, मधुकर राऊत, भास्कर ढेपले, अंबादास गोळे, माणिक पुंचे, विजय पाटील, विठ्ठल ढेपले, राजेंद्र ढेपले, शरद ढेपले, दत्तात्रय ढेपले, नंदू कापसे, दीपक गाजरे, सुहास सुराळीकर, डॉ. नितीन धारराव, साहेबराव बर्डे, किशोर ढेपले, शरद वनसे, शाम गोळे पवन चोरडिया, सोसायटी सचिव विठ्ठल कोटकर सोसायटी कर्मचारी शंकर हिंगमेरे बापू मोरे, मनोज धारराव नितीन कुंदे, योगेश कुंदे संतोष कुटे, वेचु आहेर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सभासद, निफाड सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला.