महाराष्ट्रपवारांनी मिळवलेली धनगर समाजाची सहानभूती महायुतीने पळवली!! हिंगोलीतून सचिन नाईक यांना उमेदवारी...

पवारांनी मिळवलेली धनगर समाजाची सहानभूती महायुतीने पळवली!! हिंगोलीतून सचिन नाईक यांना उमेदवारी देवून परत मिळवणार का?

spot_img

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना लोकसभेची एक जागा देऊन महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी धनगर समाजाची मिळवलेली सहानभूती महायुतीने पळवून निवडणुकीच्या रिंगणात रंग भरल्याचे दिसून येत आहे.

काल दुपारपर्यंत महायुतीचा धर्म न पाळणाऱ्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अचानक महादेव जानकर यांना लोकसभेची एक जागा सोडून धनगर समाजाची सहानभूती मिळविण्यात यश प्राप्त केले आहे.

धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढणे, धनगर समाजासाठी जाहीर केलेल्या अनेक योजनाची अंमलबाजावणी न करणे तसेच लोकसभेत धनगर समाजाला महायुतीमधून उमेदवारी न दिल्याने धनगर समाजातील हजारो युवक सोशल मीडिया वरून प्रचंड संताप या सरकारवर अनेक दिवसापासून व्यक्त करीत होता.

यातच  महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी महादेव जानकर यांना माढा लोकसभेची जागा देण्याचे जाहीर केले आणि धनगर समाजाची सहानभूती मिळवली. त्यामुळे शरद पवार यांच्यावर अनेक दशकापासून नाराज असलेला धनगर समाज आपोआपच थोडासा शांत झाला. हे महायुतीचे नेते मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात यायला अजिबात वेळ लागला नाही. धनगर समाजाच्या रोषाला बळी पडण्यापेक्षा १ जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देवून शरद पवार यांनी धनगर समाजाची मिळवलेली सहानभूती महायुतीने पळवली शिवाय महायुतीचा धर्म पाळल्याचे दाखवून दिले.

कांहीही झाल तरी महादेव जानकर लोकसभेत जाणार हे नक्की झालच आहे परंतु महायुतीने पळविलेली धनगर समाजाची सहानभूती महाविकास आघाडी पुन्हा हिंगोलीची जागा सचिन नाईक यांना देवून परत मिळविण्यात यशस्वी होईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्याच्या सर्वोत्तम कामगिरी मध्ये धनगर समाजाचे चमकले 3 तारे

मुंबई (धनगर माझा) : सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता...

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...