अमरावती : मेघालय राज्याचे राज्यपाल तथा कर्नाटक राज्यातील ज्येष्ठ नेते महामहीम चंद्रशेखर एच विजयशंकर यांच्या भेटी दरम्यान मांगीलाल प्लॉट अमरावती येथे विविध संघटनांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केलेले होते. धनगर समाज संघर्ष समिती, मेंढपाळ धनगर विकास मंच महाराष्ट्र, राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन, देवा संघटना, अहिल्या महिला परिषद व गोविंदा ग्रुप, मांगीलाल प्लॉट इत्यादी संघटनांचा सहभाग होता. धनगर व इतर समाज बांधवांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी मंचावर माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष महात्मे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी मेंढपाळ धनगरांच्या समस्यांचा उलगडा केला. महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित मागण्या बाबतचे निवेदन सादर केले. माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाज संघर्ष समिती गेल्या 2013 पासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करीत असून शासनाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले. मात्र या सरकारने धनगर समाजाच्या करिता आदिवासींच्या योजनांच्या धरतीवर सुविधा देण्याकरिता 1000 कोटी योजनेची मागणी मान्य केल्याचे सांगितले. महामहीम राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकरजी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र हे शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवींची पवित्र भूमी असून या राज्यातून बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले असे गौरवउद्वार काढले त्यांच्यामुळेच मी धनगर समाजाचा असूनही आज राज्यपाल बनू शकलो.
अंबानगरी ही पुण्यनगरी असून येथे देवतांचे निवास आहे. येथे जन्म घेणारे सर्व पुण्यवान व्यक्ती आहेत. असे भावपूर्ण उदगार काढले. मेंढपाळ धनगर समाजाच्या उत्थनासाठी मी सतत महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांसोबत संपर्कात राहून समस्या सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे, वाशिम येथील सोनाली ठाकूर व परिसरातील मान्यवर उपस्थित होते. महामहीम राज्यपाल माननीय चंद्रशेखर एच विजयशंकरजी व मा. खासदार पद्मश्री डॉक्टर विकासजी महात्मे यांचे स्वागत व सत्कार राजमाता फाउंडेशन अहिल्यादेवी फाउंडेशन चे माधुरीताई ढवळे अनुश्री ठाकरे संदिप राठी पदाधिकारी, धनगर समाज संघर्ष समितीची राज्याध्यक्ष अनंत बनसोडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र गोरटे रमेशराव ढवडे प्रविन भुजाडे जानरावजी कोकरे, हरिभाऊ शिंदे ज्ञानेश्वर ढोमने सुभाष गोहञे विश्वास काळे अशोक गंधे व गोविंदा ग्रुप, मांगीलाल प्लॉट रामेश्वर गग्गड प्रविन वाघमारे राजु जुनघरे या संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. या समारोहाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. मेघशाम करडे यांनी केले. समारोहाची सांगता एस आर पी एफ च्या बँड पथकावरील राष्ट्रगीताने झाली.