चौंडी, पट्टणकोडोली, आरेवाडी, आदमापुर भेटीनंतर १९ रोजी अमरावतीत मेंढपाळांना भेटणार
अहिल्यानगर : सुमारे २५० वर्षापूर्वी सलग २८ वर्ष राज्यकारभार करणार्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी मेघालयचे राज्यपाल मा. आदरणीय श्री. सी. एच. विजयशंकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या उभारलेल्या स्मारकास सदिच्छा भेट देवून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी तेथील सर्व परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी मा. राज्यपालसो सी. एच. विजयशंकर यांचा सत्कार महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री तथा चौंडी विकासाचे शिल्पकार मा. डॉ. आण्णासाहेब डांगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे साहेब तसेच शासकीय अधिकारी व समाज पदाधिकारी उपस्थित होते.
मागच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, गोवा व मध्य प्रदेश आदी राज्यातील लोकांचे दैवत असलेल्या श्री क्षेत्र विठ्ठल बिरुदेव पट्टणकोडोली, आरेवाडी बिरोबा तसेच श्री क्षेत्र आदमापुर येथील श्री संत बाळूमामा आदि तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन दर्शन घेतले. तर दि १९ रोजी अमरावती जिल्ह्यातील मेंढपाळांना व कार्यकर्त्यांना भेटी देऊन संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील धनगर समाज संस्कृतीला महत्व देवून दौरा करणारे देशातील पहिले राज्यपाल असल्याचे बोलले जात आहे.