सोलापूर : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर धनगर समाजाच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. हे आंदोलन होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी व धनगर समाजाच्या शिष्ठमंडळाची यशस्वी बैठक १३/०७/२०२४ रोजी संपन झाली.
सदर बैठकीला प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हापोलीस प्रमुखं शिरीष सरदेशपांडे ,DYSP अर्जुनसिंह भोसले , तहसीलदार,सचिन लंगुटे आदि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत …
१. पंढरपूर शहरा मध्ये पु. अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे.
२. पंढरपुर येथे पु. अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनसाठी जागा व निधी उपलब्ध करून देणे.
३. धनगर समाजातील तरुणांना आण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर उद्योग धंदा उभारण्यासाठी बिन व्याजी विनातारण तीस लाखरुपयांपर्यंत कर्ज पुरवठा शासनाकडून मिळावा. आदि मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या पैकी वरील (१ व २) मागण्या तत्काळ मान्य करुन एक महिन्याच्या आत पूर्ण करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. तर मागणी क्रमांक ( ३ ) हे शासन स्तरावर असल्या मुळे शासन स्तरावर बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आश्वासना मुळे मुख्यमंत्र्याच्या भेटी नंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले.
सदर बैठकीला विश्रांतीताई भुसनर,माऊली (भाऊ)हलनवर, आदित्य (दादा) फत्तेपूरकर, सुभाष मस्के (सर) , सोमनाथ ढोणे, पंकज देवकाते, प्रशांत घोडके,संजय लवटे (सर), प्रसाद कोळेकर, अजय देशमुख, सतीश लवटे उपस्थीत होते.