परभणीश्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक...

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

spot_img

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी शाळेचे मुख्याध्यापक डी.सी.डुकरे यांना इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथील लोकराजा शाहू महोत्सव समितीचा२०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. तसे समितीचे प्रमुख अरूण कांबळे यांनी लेखी पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे डुकरे सर यांच्यावर प्रेम त्यांच्या चाहत्याकडून अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे.

श्री. डुकरे सर हे इयत्ता पहिली इंग्रजी पुनर्रचित अभ्यासक्रम ते इयत्ता दहावीचा इंग्रजी सुधारित अभ्यासक्रमाच्या जिल्हा स्तरावरील शिक्षक प्रशिक्षणातील प्रशिक्षक तसेच वैशाखवणवा काव्यसंग्रहाचे कवी, राज्य मुख्याध्यापक महासंघाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय अध्यक्ष, परभणी जिल्हा इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष, शिक्षक नेते म्हणून अनेक जबाबदाऱ्या पार पडताना दिसून येतात.

यापूर्वी डी.सी.डुकरे यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीडचा राजे यशवंतराव होळकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार, राजे मल्हाराव होळकर गणेश मंडळ पुर्णाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईचा राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार, नागरी विकास संस्था छत्रपती संभाजीनगरचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला असून त्यांच्या आई कवितेस मुक्ताई फाऊंडेशन बारामतीचा राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार, त्यांच्या कवितेस माजी आमदार दगडुजी गलांडे समिती कलावतीबाई काळे वाचनालय हाताळा जिल्हा हिंगोलीचा राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार, त्यांच्या वैशाखवणवा काव्य संग्रहास मिश्किनशहा बाबा प्रकाशनचा बिरसा मुंडा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत.

त्यांच्या या गौरवशाली यशाबद्दल गोदावरी शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, राज्य मुख्याध्यापक महासंघाचे राज्य, विभाग,जिल्हा,तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी, परभणी जिल्हा इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळीचे सर्व कर्मचारी,राज्यातील अनेक क्षेत्रातील मित्र मंडळाकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्याच्या सर्वोत्तम कामगिरी मध्ये धनगर समाजाचे चमकले 3 तारे

मुंबई (धनगर माझा) : सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...