इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे. त्यांचे वय ७२ वर्षे होते.
महाराष्ट्राचे माजी मंत्री मा. श्री. आण्णासाहेब डांगे यांचे जेष्ठ चिरंजीव व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे व माजी नगरसेवक श्री. विश्वनाथ डांगे यांचे बंधु होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी रविवार दिनांक ८/१२/२०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता कापूसखेड नाका येथील स्मशानभूमीत आहे.
कै. सर्जेराव डांगे (दादा) हे उत्तम शेतकरी होते तसेच पोलीस दलातही त्यांनी सेवा बजावली होती.
धनगर माझा परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली