बीडलक्षात ठेवा, आम्ही कायदा हातात घेणार नाही पण... ना. छगन भुजबळ...

लक्षात ठेवा, आम्ही कायदा हातात घेणार नाही पण… ना. छगन भुजबळ आक्रमक

spot_img

बीड : लक्षात ठेवा.. आम्ही कायदा हातात घेणार नाही पण संविधानाने दिलेला अधिकार बाळगल्याशिवाय राहणार नाही, आम्ही पेटवणारे नाही पण पटवणारे आहोत आम्ही मोडणारे नाहीत पण घडवणारे आहोत, आम्ही त्रास देणार नाही.. आम्ही जाळणारे नाही पण जुळवणारे आहोत.. तुम्ही जर आमचे घर जाळलं तर आम्ही गप्प बसणार नाही.. आम्ही मेल्या आईचं दूध पिलेलो नाही. असा इशारा ओबीसींचे नेते माननीय छगन भुजबळ यांनी बीड येथील ओबीसीच्या महाएल्गार सभेमध्ये दिला.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर, मा. आ. प्रकाश अण्णा शेंडगे, शब्बीर अन्सारी, प्रा. टी पी मुंडे, यांच्यासह अनेक ओबीसीचे नेते उपस्थित होते. या सभेला लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.

आ. महादेव जानकरांनी धरले भुजबळांचे पाय

‘गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे महाराष्ट्राचा हुंकार आहेत. आता गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न छगन भुजबळ यांनी पूर्ण करावे.  त्यांनी मुख्यमंत्री व्हावे,’ आम्ही त्यासाठी कड्याच पाणी करू असे म्हणत आ. महादेव जानकर यांनी भाषण थांबवून छगन भुजबळ यांचे पाय धरले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...