नाशिकपु. अहिल्यादेवी होळकर जयंतींनिमित्त चांदवड मध्ये महिलांच्या हस्ते महाआरती व महिला मंडळांना...

पु. अहिल्यादेवी होळकर जयंतींनिमित्त चांदवड मध्ये महिलांच्या हस्ते महाआरती व महिला मंडळांना पुरस्कार

spot_img

चांदवड : पु. अहिल्यादेवी होळकर जयंतींनिमित्त चांदवड येथील रंगमहाल (होळकर वाडा) येथे जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव व अहिल्यादेवी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यानिमित्ताने महाआरती व कर्तृत्ववान २६ महिला मंडळांना अहिल्यादेवी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याप्रसंगी प्रा. दत्तात्रय राजनोर यांचे अहिल्यादेवी चरित्रावर व्याख्यान झाले.

यावेळी कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रामविकास संस्थेच्या अध्यक्ष मीनाताई कोतवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, माजी सरपंच सुनील कबाडे, पोलिस निरीक्षक कैलास वाघ, महेश गुजराथी, विजय जाधव, अनिल काळे, कवी विष्णू थोरे, डॉ. भूषण शिरूडे, सोनुपंत ठाकरे, हर्षल गांगुर्डे, धनंजय पाटील, परवीन बागवान, सूरज चिंचोले, पुरुषोत्तम काकड, अंबादास आहेर, सुनील सोनवणे, सोमनाथ जाधव, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य दत्तात्रेय बारगळ यांच्या मार्गदर्शनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीचे सदस्य डॉ. तुषार चिंचोले, प्रा. विजय बढे, पिंटू गाढे, सचिन खैरनार, बाळा पाडवी, स्मिता पगारे, आदींनी नियोजन केले. मान्यवरांच्या हस्ते २६ महिला मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. रंगमहाल (होळकर वाडा) येथे राजगादीवरील अहिल्यादेवी यांचे मूर्तीचे शास्त्रोक्त पूजन पुरोहित भूषण दीक्षित यांनी केले. असंख्य महिलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व मान्यवरांचे भाषण झाले. सन्मानपत्राचे वाचन कवी विष्णू थोरे यांनी केले. संजय पाडवी यांनी सूत्रसंचालन केले. विजय बढे यांनी आभार मानले.

मान्यवरांच्या हस्ते पुढीलप्रमाणे महिला मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

१) श्री संताजी महिला मंडळ,चांदवड

२) रक्षीता नारी आधार बहुउद्देशीय संस्था चांदवड 

३) त्रिलोक महिला मंडळ, वरचेगाव चांदवड 

४) शिवकृपा महिला मंडळ, लोहारगल्ली

५) श्री रेणुका देवी महिला भजनी मंडळ, चांदवड

६) चांदवड ब्राह्मण संघ महिला मंडळ

७) श्री महालक्ष्मी गुजराथी महिला मंडळ चांदवड

८) जय जिजाऊ महिला राष्ट्र सेविका समिती चांदवड

९) सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महिला मंडळ चांदवड

१०) अहिरे सुवर्णकार महिला मंडळ चांदवड

११) नवदुर्गा महिला मंडळ , शिंपी गल्ली , चांदवड

१२) स्व. माजी आमदार जे. डी. कासलीवाल चॅरिटेबल ट्रस्ट चांदवड

१३) मराठा महिला मंडळ , हत्तीखाना , चांदवड

१४) छत्रपती संभाजी महाराज महिला मंडळ , टेलिफोन कॉलनी , चांदवड

१५) राजांनी शिंपी समाज महिला मंडळ , चांदवड

१६) श्री सप्तशृंगी देवी नवरात्रोत्सव मंडळ , श्रीराम कॉलनी , चांदवड

१७) वीरशैव लिंगायत , चंद्रेश्वर महिला मंडळ , चांदवड

१८) सावली गृप चांदवड

१९) दिगंबर जैन महिला मंडळ , चांदवड

२०) कच्छादेवी महिला मंडळ चांदवड

२१) संत गाडगेबाबा महिला मंडळ चांदवड

२२) राजराजेश्वरी महिला मंडळ चांदवड

२३) गो-सिया महिला मंडळ चांदवड

२४) लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ

२५) कालिका देवी महिला मंडळ चांदवड

२६) श्री सप्तशृंगी महिला मंडळ , डांबरविहीर चांदवड

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...