पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांनी दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी आपल्या भाषणात अनेक वर्षापासून अहिल्यादेवी होळकर स्मारकाची प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करावी अशी विनंती केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून पद्मश्री गिरीषजी प्रभूने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अश्विनी जगताप, हेमंत हरहरे, विलास लांडगे, कामगार नेते बाबा कांबळे , माजी नगरसेवक नाना काटे, सुलक्षणा शिलवंत, नामदेव ढाके, सदाशिव खाडे, मोरेश्वर शेंडगे, सूर्यकांत गोफणे, अभिमन्यु गाडेकर,लक्षमन रुपणर, माणिकराव बारगळ, भुजंग दुधाळे, नामदेव सोनवलकर, अशोक खरात, आदि. मान्यवर उपस्थित होते.
या वर्षीच्या जयंती महोत्सवाच्या निमिताने देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार २०२४ हा अत्यंत मनाचा पुरस्कार कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांना पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर लेखक चिन्मय मुळये लिखित अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील इंग्रजी भाषेतील “क्वीन ऑफ इंडोमिटेबल स्पिरीट” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जयंती महोत्सव समितीच्या वतीने राबविण्यात येणार्या विद्यार्थी पालक दत्तक योजना व इतर उपक्रमांची माहिती मा. नगरसेवक राजू दुर्गे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात दिली.
दिवसभरातील भरगच्च कार्यक्रमामध्ये गजीनृत्य, तसेच पु. अहिल्यादेवी होळकर यांच्या शौर्यावरील लोकगीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. तर जवळपास १०० नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
या कार्यक्रमासाठी संदीप, जाधव, प्रदीप पाटील, महेशर मराठे, बाळासाहेब वालेकर, महादेव कवितके, रमेश लबडे, गजानन वाघमोडे, राजेंद्र सोनटक्के, मधुकर लंभाते, राजेंद्र माने, काळूराम कवितके, गोविंद वलेकर, यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण दिवसभरामध्ये भोसरी विधानसभेचे आ. महेश लांडगे, संजोग वाघिरे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त संदीप खोत, आरोग्य संचालक लक्षमन गोफणे, अनेक मा. नगरसेवक, सामाजिक राजकीय कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी पु. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पअर्पण करून अभिवादन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष धनंजय तानले व मा. नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय दूधभाते, मनोज मारकड, बंडू मारकड, गणेश खरात, महावीर काळे, परमेश्वर उगारे, संजय कवितके, संजय नाईकवडी, तेजस्विनी दुर्गे, पल्लवी मारकड, आशा काळे, सोनाताई गडदे, रेखा दूधभाते, सुवर्णा सोनवलकर, राजेंद्र गाडेकर, बिरु व्हनमाने, विठ्ठल देवकाते, भारत मदने, अजित चौगुले, संतोष पांढरे, संतोष रुपनर, नवनाथ देवकाते, सुनील बनसोडे, हिराकांत गाडेकर, दत्ता मोसलगी, बाबीर मेटकरी, बंडू लोखंडे,आंबादास पडळकर व आदि सदस्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विना सोनवलकर, अजय चौगुले यांनी केले तर आभार राजेंद्र घोडके यांनी मानले.