UncategorizedMPSC :  राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर, महेश घाटुळे राज्यात प्रथम

MPSC :  राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर, महेश घाटुळे राज्यात प्रथम

spot_img

मुंबई : महाराष्ट्र राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी दि. २६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. महेश अरविंद घाटुळे यांने ५९४ गुण मिळवून राज्यात पहिला येऊन बाजी मारली आहे. महेश धनगर समाजातील असून मूळचा धाराशीव जिल्ह्यातील घारगाव ता. कळंब येथील असून त्यांचे वडील शिक्षक आहेत. खेड्यातील मुलगा राज्यात पहिला येऊन उपजिल्हाधिकारी झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसून येत आहे. आता उमेदवारांना आपल्या पदांचे पसंतीक्रम द्यावे लागणार असून त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 साली गट अ आणि गट ब दर्जाच्या 303 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी ८९६ जणांची  सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये धनगर समाजाचे म्हणजेच एनटी सी चे एकूण ५२ जणांचा समावेश असून त्यामध्ये १३ महिला आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाना जाहीर केलेली ही गुणवत्ता यादी ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो. प्रस्तुत सर्वसाधारण गुणवत्ता यादी विविध न्यायालयात, न्यायधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...