पुणेमहाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

spot_img

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न फौंडेशन संचलित महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. होळकर प्रेमी व श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रतिमेच्या मिरवणुकीने सुरवात झालेला सोहळा मान्यवरांच्या सभेने संपन्न झाला.

सोहळ्यास माजी पोलीस सहाय्यक आयुक्त रुक्मिणी गलांडे या अध्यक्ष म्हणून लाभल्या. त्यांनी महाराजा यशवंतराव यांच्या कार्याचा गौरव केला, तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना करियर विषयक मार्गदर्शन केले.

जयंती निमित्त राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या मध्ये जय मल्हार सेना पुणे शहर अध्यक्ष प्रकाश घंटी, अखंड होळकरशही या पुस्तकाचे लेखक मा. उज्वलकुमार माने, युवक कल्याण व व्यायाम केंद्राचे मा. विठ्ठल कडू, सामाजिक नेते मा. नवनाथ पडळकर, गणेश केसकर, श्रीकांत वाघमोडे, मयूर थिटे,अण्णासाहेब मतकर, प्रल्हाद सोरमारे, अनिल झोरे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे कला शिक्षक मा. विजय कराळे यांनी महाराजा यशवंतरावांचे अतिशय सुंदर असे खडूंच्या साह्याने काढलेले चित्र होळकर प्रेमींचे लक्ष वेधून घेत होते.
जय मल्हार सेनेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रंचलन समितीचे उपाध्यक्ष विकास माने, तर प्रास्ताविक अहिल्या रत्न फौंडेशनचे अध्यक्ष विक्रांत काळे यांनी केली. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका जयश्री आसवले यांनी आलेल्या पाहुण्याचे स्वागत केले. समितीचे अध्यक्ष योगेशराजे होळकर यांनी महाराजा यशवंतराव होळकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी या कार्यातून प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे सांगितले. विजय कराळे यांनी अलेल्यांचे आभार मानले.

उत्सव समितीचे अध्यक्ष योगेशराजे होळकर, सचिव योगेश काळे, गजानन ठोंबरे, राजेश होळकर, संतोष वरक, संतोष होळकर आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्याच्या सर्वोत्तम कामगिरी मध्ये धनगर समाजाचे चमकले 3 तारे

मुंबई (धनगर माझा) : सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता...

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...