यशोगाथाइंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार विजेते डॉ. शरद गलांडे यांचा जीवन...

इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार विजेते डॉ. शरद गलांडे यांचा जीवन प्रवास

spot_img

प्रा. डॉ. शरद महादेव गलांडे,  जावली ता. फलटण जि.सातारा. हे मे रोजी २०२४ रोजी प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र विभाग,राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.

सरांचे वडील प्राथमिक शिक्षक असून स्वाभिमानी आणि जिद्दी स्वभावाचे, सामाजिक कार्यात सहभागी होणारे. वडिलांकडून स्वामी आणि जिद्दी स्वभाव, सामाजिक कार्याचा वसा त्यांनी वडिलांकडून घेतला.  जावली मध्ये शाळा घरापासून  साडेतीन किलोमीटर  अंतरावर असल्याने   पणदरे येथे मामाच्या गावात शिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय  पक्का झाला. सन १९६९ ते १९७४  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनुमानवाडी ,पणदरे येथे शाळेचा श्री गणेशा सुरू झाला. सन १९७४ ते १९८० या काळात माध्यमिक शिक्षण नव महाराष्ट्र   महाविद्यालय , पणदरे ता. बारामती जि. पुणे येथे झाले. तर १९८० ते १९८२ कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण,  तुळजाराम  चतुरचंद महाविद्यालय,  बारामती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण कृषी महाविद्यालय दापोली येथे झाले.  कृषी पदवी घेणारे जावली येथील प्रथम पदवीधर ठरले.

सन. १९८५ ते १९८८  पदव्युत्तर शिक्षण, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झाले. पदव्युत्तर महाविद्यालयात शिकत असताना, १९८६ ते १९८८ या दोन वर्षाकरिता भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांची  रुपये २४,०००/  शिष्यवृत्ती मिळाली. 

शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमांमध्ये हिरहिरीने सहभागी होत होते. सन १९८६ साली रशियाचे १००  युवक आणि भारताचे ५०० यांचा युवक महोत्सव, मुंबई येथे पार पडला.  महोत्सवामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल चित्ततोष मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने कमल नयन बजाज मेमोरियल  वक्तृत्व स्पर्धा, वर्धा,  तर रामकृष्ण मिशन कलकत्ता आणि  विवेकानंद केंद्र कन्याकुमारी येथे युवक शिबिरामध्ये सहभागी झाले. तर राष्ट्रसेवा दलातर्फे सरदार सरोवर , केवडिया कॉलनी (गुजरात) येथे वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते. पदव्युत्तर शिक्षणानंतर सन  १९८८ ते १९९० मध्ये आय.सी.आय. इंडिया  लिमिटेड, चेन्नई येथील  मल्टिनॅशनल कंपनीमध्ये विक्री अधिकारी म्हणून यवतमाळ येथे  सेवेस सुरुवात झाली. कंपनीत सिंथेटिक पायरेथायरॉईड विक्रीमध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. पुसद येथे तणनाशक विक्री करण्याकरता चे प्रात्यक्षिके ऊस आणि गहू पिकामध्ये घेतली.

त्यानंतर २३ जून ,१९९० रोजी  किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक कार्यक्रमांतर्गत उद्यान विद्या शिक्षक म्हणून तुळजाराम चतुरचंद  महाविद्यालय बारामती येथे रुजू होऊन  १५.१०.१९९२ पर्यंत कार्यरत होते.

सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र पदावर  निवड झाल्याने, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प इगतपुरी येथे १६.१०.१९९२   रुजू झाले.  नोव्हेंबर, १९९२  साली महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोगातर्फे वित्त व लेखा अधिकारी वर्ग – २  पदावर निवड झाली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात निवड होऊनही  निर्णयानुसार शिक्षण क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय  पक्का घेतला.  कृषीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निवड होणार जावलीतील प्रथम  व्यक्ती ठरले.

इगतपुरी येथून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र , पाडेगाव येथे  कृषी दिनी म्हणजेच १.७.१९९५ रोजी  पाडेगाव येथे संशोधन सुरुवात झाली. पाडेगाव येथूनच आचार्य पदवी संपादनाकरिता २.१२.१९९८ ते २.१२.२००० शैक्षणिक रजेवर  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे प्रवेश घेतला.  माझ्या जीवनातील अंधश्रद्धेतून पुन्हा नागपंचमी हा प्रथम लेख  नाग अळी या विषयावर लिहिला होता. त्याच  अमेरिकेतील नागअळीवर आचार्य पदवी प्राप्त केली. 

आचार्य पदवी मध्ये मित्र किटकांच्या दोन  नवीन प्रजातींचा शोध लावला , उपजीविका करणाऱ्या २७  वनस्पती ( ११ पिके आणि १६ तणे), नागअळी पिकांवर कधी येईल याचे हवामानावर  आधारित सूत्र  ,  नियंत्रणाकरिता  चिकट पिवळे सापळे कोणत्या उंचीवर आणि किती दिवस लावावेत त्याचबरोबर नागअळीचे प्रौढ कोणत्या वेळी सापळ्याकडे जास्त आकर्षित होतील याचा अभ्यास, १६ कीटकनाशकांची  चाचणी घेऊन, पाच कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी  करण्याचा अभ्यास.  अमेरिकन  नाग अळीच्या नियंत्रण करण्याचे एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्र विकसित केले.

आचार्य पदवीचे तोंडी/ मौखिक परीक्षा घेण्याकरिता डॉ. शिवाजीराव सरोदे, माजी संचालक ( संशोधन) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आले होते. 

माझे  संशोधनाचे सादरीकरण झाल्यानंतर,  ते म्हणाले, माझ्या आयुष्यात असा  उत्कृष्ट प्रबंध  मी पाहिला नाही. लवकरात लवकर संशोधन लेख प्रकाशित करावेत आणि संशोधनातील उत्कृष्ट योगदान केल्याने मौखिक परीक्षा न घेताच  आचार्य पदवी बहाल  करण्याचा निर्णय जाहीर केला. हा माझ्या संशोधन कार्याचा खूप मोठा गौरव होता.  उत्कृष्ट करियरसाठी सरोदे सरांनी तुम्ही मुख्य प्रवाहात  राहुरीला बदली करून घ्या. असे  सुचवले.

आचार्य पदवीनंतर  पुनश्च हरी ओम :  या  ऊक्तीनुसार पाडेगाव येथे  संशोधन कार्यास प्रारंभ केला.

उसावर  जुलै २००३ मध्ये  लोकरी मावा नावाची महाभयंकर कीड  आली. ऊसाला फवारणी लागत असल्याने, शेतकरी हवालदिल झाले. साखर उद्योग अडचणीत आला. मावा किडीमुळे ऊस लागवडीत एक लाखाची घट, उस उत्पादन २० ते ३०  टन , तर साखर उतारा  ०.५ ते २.० युनिटने घसरला.  भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी  विशेष बाब म्हणून  लोकरी मावा संशोधन कार्यकरिता १७ लक्ष रुपयाचे  अनुदान दिले.  २००३ ते २००६  पर्यंत एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्र विकसित केले. या संशोधनामुळे महाराष्ट्रातील  साखर उद्योग आणि  शेतकऱ्यांचे ७३९  कोटी रुपयांचे नुकसान टाळण्यास यशस्वी झाले. या कार्यामुळे भारतामध्ये खूप मोठी प्रसिद्धी मिळाली.  उसाची जास्त साखर उतारा देणारी को ९४०१२ आणि  क्षारपड जमिनी करता  को.एम . २६५ जाती विकसित करण्यामध्ये तेही सहभाग होते. अहिल्यादेवी सामाजिक शिक्षण संस्था धोंडेवाडी,कराड  होळकर संस्थेने त्यांना २००४  साली कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित केले.  संशोधनाला यश येत होते परंतु विद्यार्थी घडविण्याकरिता २४  जून, २००५ रोजी पुणे कृषी महाविद्यालयात रुजू झालो. योगायोगाने  सहयोगी अधिष्ठाता डॉ.  दिनकर सावंत यांनी सन २००६ माझ्याकडे  सेवा योजनेचा  (रा.से.यो.) कार्यक्रम अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार   दिला.  हा पदभार माझ्याकडे फक्त तीन वर्षच होता. या तीन वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या साथीने, माझ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने पुणे कृषी महाविद्यालयाचे रा.से.यो. युनिट   प्रसिद्धीस आले. तत्कालीन सहयोगी अधिष्ठाता डॉ. रामचंद्रजी साबळे आणि डॉ.  भीमराव उलमेक , तसेच  विद्यापीठ रा.से.यो. समन्वयक डॉ. राजीव नाईक   भक्कम पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळाले. कृषी तंत्रज्ञान  प्रसारासाठी  राष्ट्रीय सेवा योजना  हा नाविन्यपूर्ण उपक्रम पुणे कृषी महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षांमध्ये सुरू केला होता.

लवळे येथे विद्यार्थी  – शेतकरी मंचाची स्थापना केली.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या सक्रिय सहभाग मुळे लवळे गावास जिल्हा परिषद पुणे चा कृषी पुरस्कार आणि निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला. त्याचे श्रेय ग्रामस्थांनी पुणे कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटला आणि आणि डॉ. शरद गलांडे  यांना दिले. वरिष्ठांची निवड  सार्थ ठरवून उत्तम आगलावे यास  २००६ – ०७ या वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट स्वयंसेवक  पुरस्कार तर त्यांना २००८- ०९ उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी  तर भारत सरकारचा इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार  रौप्य पदकासह  रुपये २०,०००  त्यांना सन्मानित केले तर पुणे कृषी महाविद्यालयाच्या  रा.से.यो.युनिटला सन्मानचिन्हासह  रुपये ७५,००० देऊन  गौरविण्यात आले.

सदर पुरस्कार १९९४ सालापासून सुरू झाला असून कृषी विद्यापीठातील कोणत्याही  कार्यक्रम अधिकारी  आज पर्यंत प्राप्त झालेला नाही हे नम्रपणे   सांगत आहे.

२०१० -११ सालापासून महामहीम राष्ट्रपती या पुरस्काराचा पुरस्कार तिचा सन्मान करीत आहेत. असा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. असे सन्मान मिळवणारे फक्त आणि फक्त  “महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ” हे आहे.

फलटण तालुक्यातील जावली ग्रामस्थांना आपल्या गावातील व्यक्तीची राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे सन्मान झाला. याचा खूप आनंद ग्रामस्थांना झाला. त्यांनी डॉक्टर शरद गलांडे गौरव समिती  स्थापन करून  साताऱ्याचे जिल्हा पोलीस प्रमुख, विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते त्यांनी  गौरविले .पुणे महानगरपालिकेने शिक्षक दिनी ५ सप्टेंबर २००८  रोजी उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने  सन्मानित केले. 

कोलंबो, श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये उत्कृष्ट पेपर सादरीकरणाचा पुरस्काराने  २७ सप्टेंबर २०१८  रोजी  सन्मानित केले. पहिल्या आंतरराष्ट्रीय जैविक किड नियंत्रण परिसंवादामध्ये उत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्काराने , २९ सप्टेंबर, २०१८ रोजी  बेंगलोर येथे सन्मानित केले.

सोसायटी ऑफ बाय कंट्रोल ऍडव्हान्समेंट, ICAR -NBAIR, बेंगलुरु  या संस्थेच्या कार्यकारी परिषदेवर २०१७ निवड  झाली.  त्यापासून आज पर्यंत संस्थेवर कार्यरत आहे.महाराष्ट्रामध्ये  फळमाशीच्या सात प्रजातींची नोंद आंबा आणि पेरू पिकावर केली.

  ५ मार्च २०१९ साली, राष्ट्रीय स्तरावरील कामाची दखल घेऊन  “भारत सरकार, भारतीय खेल प्राधिकरण, नवी दिल्ली ,  नेहरू युवा केंद्र,  सातारा आणि जिल्हाधिकारी सातारा यांच्या वतीने त्यांना सातारा भूषण  पुरस्काराने  गौरविण्यात आले होते.

आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत  नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपुर   येथे  २०१३ -१४ ते २०१६ -१७ पर्यंत राबविला. १० आंतरराष्ट्रीय आणि २५ राष्ट्रीय परिसंवादामध्ये सहभागी होऊन परिसंवादामध्ये  संशोधन सादरीकरण केले. ७८  संशोधन  आणि तांत्रिक लेख २५ विस्तार लेख लिहिले. १५ आकाशवाणी अंतर्गत दूरदर्शन वर कृषी तंत्रज्ञान प्रसारणाचे  कार्यक्रम झाले.  

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे कीटकशास्त्र विभागात मी दोन वर्षापासून कार्यरत आहे. सन २०२२-२३ यावर्षी   ३६  लाख रुपये तर २०२३ – २४ सालाकरिता २९ लाख रुपये महसुली उत्पन्न  त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने

कृषी महाविद्यालय , कोल्हापूर मधून  विद्यापीठास मिळवून दिले.विद्यापीठ सेवेत असताना महात्मा फुले प्राध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा सन २०२० ते २०२२ या कालावधीमध्ये कार्य केले.

प्रशासनीय पत्र: 

१. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर यांनी कवितेस  प्रशंसनिय  अभिप्राय दिला. 

२. महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व आणि स्वामी विवेकानंद या लेखा साठी प्रशंसापत्र दिले.

३. पद्मभूषण अण्णा हजारे यांनी  पाणलोट क्षेत्र विकासावर आधारित कशी पिकणार व आमची काळी आई या कवितेस प्रशंसनिय  पत्र दिले.

सामाजिक उपक्रम :

१. महादेव गलांडे गुरुजी सामाजिक विकास मंडळ , जावली  या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जावली हायस्कूल, जावली आणि अंगणवाडी, जावली येथील मुलांना सलग  २२  वर्ष गणवेश वाटप, आणि दोन वेळा सतरंज्या,  आणि कॉम्प्युटर रूम करिता वीस फुटाचा पडदा दिला .

२. सन २००५ साली महादेव गलांडे गुरुजी सेवाभावी विकास मंडळातर्फे  राजे मल्हारराव होळकर वाचनालयाची स्थापना केली. संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत. सध्या वाचनालयास  क दर्जा प्राप्त असून रुपये ९६   हजार  रुपयांचे अनुदान  महाराष्ट्र शासनातर्फे मिळत आहे.

३. पैलवान रंगनाथ मारकड कुस्ती केंद्र, इंदापूर या संस्थेचा संचालक या नात्याने संस्थेच्या उपक्रमात सहभागी.  गादी आणि माती आखाडा आणि  शंभर मल्लांची निवासस्थानची सोय उपलब्ध आहे. 

संस्थेच्या माध्यमातून तीस राष्ट्रीय   पुरस्कार विजेते मल्ल निर्माण झाले. जवळपास ४०० मल्लांना सेनादल  आणि पोलीस खात्यामध्ये निवड झाली. फलटण तालुक्यातील जावली गावचे सुपुत्र डॉ. शरद गलांडे यांनी  राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ३२ बत्तीस वर्षे सेवा करून ते ३१.५.२०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी विद्यापीठ सेवेमध्ये असताना, कृषी संशोधन आणि विस्ताराचे बहुमोल असे कार्य केले.  त्यांच्या संशोधनची  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेण्यात आली आहे. 

त्यांनी वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन स्पर्धेमध्ये महाविद्यालयामध्ये भाग घेऊन अनेक वेळा बक्षीस  मिळविली आहेत. त्यांना लेखन, वाचन , गाण्याची प्रवासाची   आवड आहे.याशिवाय त्यांचे सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा बहुमोल असे योगदान आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे जावो हीच ईश्वर प्रार्थना.

डॉ. शरद गलांडे यांच्यावर त्यांच्या मित्राने लिहलेली एक कविता

मित्र खरोखर मित्र खरोखर

 शरद गलांडे जावली कर

 आमची मैत्री एक नंबर

 शरद गलांडे जावली कर ..|| ध्रु ||

  घेतले शिक्षणाचे धडे

 अहो हनुमान वाडीवर

 नव्हती हायस्कूलची सोय

 आला  पंदाऱ्या गावावर

 शिक्षणाची गोडी फार

  केला मनाशी हट्टाहास

 काहीतरी बनवून दावू

 घेतला शिक्षणाचा ध्यास……..

 केली सामाजिक कामे

 गोर गरीबांसाठी

 राज्य राष्ट्रीय पुरस्कार

  मिळवली देशभर ख्याती

 कीटकनाशकावर त्यांनी

  अहो मिळवली डॉक्टरेट

असा मित्र मिळाला आम्हा 

 झाली गेट-टुगेदर ला भेट……..

 केले वाचनालय उभे

 वाचण्याची लागावी गोडी

 जनजागृती कंबर कसून

 गलांडे उभयतांची जोडी

  काढली व्यायामाची शाळा 

  घडले नामचीन पैलवान

 गोरगरीबचा कैवारी 

1980 ची आहे  शान………

 टीव्ही रेडिओ मुलाखती

 गजले समूह गाणं

 हस्त खेळत राहावं

 या महादेवाच्या बाळान

 मन लेखक आणि कवीचं

 आले छापून पेपरात लेख

 जावलीच्या कुशीतला

 नाथाचा हा लेक…………..

………………………..

 सुनील पवार सायन

९८६९०२८८५४

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...