अहिल्यानगरHealth : अंड खाणं चांगलं पण या 3 लोकांसाठी हानिकारक, नक्की घ्या...

Health : अंड खाणं चांगलं पण या 3 लोकांसाठी हानिकारक, नक्की घ्या डॉक्टरांचा सल्ला

spot_img

मुंबई : अंड हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. डॉक्टर देखील प्रत्येकाला अंड खाण्याचा सल्ला देतात, कारण अंड्यामध्ये काही असे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. अंड्यामध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे असतात. त्यामुळे पौष्टिक आहारामध्ये अंड्याचा समावेश केला जातो. अंड हे आपली प्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तसेच आपले हाडे मजबूत ठेवते, आपली त्वचा, केस देखील निरोगी ठेवण्यास मदत करते आणि आपल्याला ऊर्जा देखील देते त्यामुळे अंडे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते.

ज्या लोकांना उच्च यूरिक ॲसिडचा त्रास असतो अशा लोकांसाठी अंड खाणे हानिकारक ठरू शकते. कारण अंड्यामध्ये प्रथिने असते तर याच प्रथिण्यामुळे प्यूरिन बाहेर पडते त्यामुळे यूरिक ॲसिडची समस्या आणखीन वाढण्याची शक्यता असते. तसेच अंड्यातील पिवळा बलकमधील कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणामुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे उच्च यूरिक ॲसिड असलेल्या रुग्णांनी अंड खाणे टाळावे. तसेच तज्ञांचा योग्य तो सल्ला घेऊनच आहार घेणे गरजेचे आहे.

अंड हे डायबिटीज असलेले लोकांसाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे डायबिटीज असलेले लोक त्यांच्या आहारात अंड्याचा समावेश करतात. अंड्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी प्रमाणात असते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण डायबिटीस असलेल्या लोकांनी अंड जास्त प्रमाणात खाऊ नये कारण अंड्यामध्ये जे पिवळे बलक असते त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अंड जास्त प्रमाणात खाऊ नये.

अंड जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. ज्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल अशा लोकांनी अंड्याचा फक्त पांढरा भाग खावा त्यातील पिवळा बलक खाऊ नये. कारण अंड्यामधील पिवळ्या बलकमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त प्रमाणात असते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंड जास्त प्रमाणात खाऊ नये जेणेकरून कोलेस्ट्रॉलचा धोका निर्माण होणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...