पुणेपिंपरी चिंचवड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीची स्थापना; अध्यक्षपदी धनंजय...

पिंपरी चिंचवड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीची स्थापना; अध्यक्षपदी धनंजय तानले यांची निवड

spot_img

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते त्याच बरोबर विविध संघटनांच्या माध्यमातून शहरात धनगर समाजाचे कार्य करीत असलेल्या सर्व क्रियाशील कार्यकर्त्यांना माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांच्या प्रयत्नांतून सर्वांना एकत्र आणुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या 2024 ते 2025 या  पहिल्या कार्यकाळातील पहिले अध्यक्ष म्हणून धनगर माझा या वृत्तपत्राचे संपादक आणि धनगर समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते धनंजय तानले यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष धनंजय तानले यांच्या बरोबर 60 जणांची समिती देखील घोषीत करण्यात आली. सदर नियुक्तीची बैठक बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता काळभोर नगर येथील माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांच्या कार्यालयात पार पडली.

      या समिती मध्ये सर्वजण क्रियाशील सदस्य म्हणूनच काम करणार आहेत. या महोत्सव समिती मध्ये माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांच्यासह बंडू मारकड, गणेश खरात, राजाभाऊ घोडके, मनोज मारकड, संतोष गडदरे, अभिजीत शेंडगे, अशोक खरात, पोपट हजारे, विणा सोनवलकर, पल्लवी मारकड, आशा काळे, मधुकर लंबाते, राजेंद्र गाडेकर, भारत मदने, सुवर्णा सोनवलकर, संजय नायकवडे, महावीर काळे, संजय कवितके, विठ्ठल देवकाते, बाबीर मिटकरी, सूर्यकांत गोफने, नागेश वसतकर, नंदू गौरव, दत्ता मोसलगी, अजित चौगुले, सुनील बनसोडे, संतोष पांढरे, बिभीषण घोडके, राजू धायगुडे, प्रवीण गोरे, दादा मिटकरी, नितीन कोपनर, रोहिदास पोटे, विकास माने, संतोष रुपनर, सोनाताई गडदे, रुक्मिणी धर्मे, शंकर जानकर, काका मारकड, समाधान सोनवलकर, तानाजी कोपनर, नागनाथ वायकुळे, प्रसाद लोले, किशोर केळे, भिवाजी शिंगटे, विलास महानवर, नवनाथ देवकाते, रेखा दूधभाते, गजानन वाघमोडे, शिवाजी बिटके, निखिल पडळकर, महादेव कवितके, बजरंग गडदे, बाळासाहेब वाघमोडे, ईश्वर ठोंबरे, मिना ढोले, गोविंद वलेकर, काळूराम कवितके, बिरु व्हनमाने, अजय दुधभाते, भरत महानवर आदी सर्व जणांची जयंती महोत्सव समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या बैठकीत शहरातील सर्वपक्षीय सर्व संघटनेचा धनगर समाज एकत्र येऊन 31 मे रोजी साजरी होणारी जयंती एकत्रितपणे साजरी करणार आहेत. या जयंतीचे नियोजन सदर समितीच्या माध्यमातून तयार करण्यात येणार असून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेऊन जयंतीचा संपुर्ण कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. धनगर समाज बांधव त्याचबरोबर इतर सर्व समाजाच्या नागरिकांनी एकत्रित येऊन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करावी या हेतूने सर्वांनी एक दिलाने काम करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. अहिल्यादेवींचे कार्य संपूर्ण शहरातील नागरिकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवणे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे प्रमुख लक्ष असणार आहे. जयंतीच्या तयारीसाठीच्या पुढील विभागवार बैठका लवकरच घेण्याचा निर्णय सदर बैठकीत झाला आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष धनंजय तानले यांनी आपल्यावर दिलेल्या जबाबदारी बद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती महोत्सव समितीचे आभार मानले. आपल्यावर दिलेल्या जबाबदारीचा आपण योग्य पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून येणाऱ्या काळात धनगर समाजाला एकत्रित करण्यासाठी जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून प्रचंड काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष धनंजय तानले यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...