पुणे : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानी भारतीय संविधानाचा कच्चा मसुदा तयार करण्यात आला. अशा या पावन संविधान भूमीमध्ये भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब तळेगाव दाभाडे ( एमआयडीसी ) आणि समग्र विकास संस्था, तळेगाव दाभाडे यांच्यावतीने सत्कार सोहळा आयोजित केला होता.
आज पर्यंतच्या जीवनामध्ये बाबासाहेबांचे विचार, संविधानातील मूलभूत तत्वे, हक्क, उद्देशिका यांचा प्रचार प्रसार खेडोपाडी महाविद्यालयातील तरुणांमध्ये केल्याबद्दल डॉ. शरद गलांडे यांचा संविधान रक्षक २०२४ पुरस्काराने पुलवामा हल्ल्याच्या वेळी अजब शौर्य आणि साहस दाखविणाऱ्या शौर्य पुरस्कार विजेते जिले सिंग यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सदर प्रसंगी स्वागताध्यक्ष नेहरू युवा केंद्राचे माजी उपसंचालक यशवंत मानखेडकर भारत सरकार, महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस संचालक कनकररत्न, सौं.सुचिता, रोटरी क्लबचे अध्यक्ष मिलिंद शेलार,उपसचिव, भारत सरकार मिलिंद पानपाट आदि मान्यवर उपस्थित होते.