महाराष्ट्रडॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या सामाजिक, शैक्षणीक व राजकीय कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा...

डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या सामाजिक, शैक्षणीक व राजकीय कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा : मा. महेंद्रआप्पा लाड

spot_img

इस्लामपूर : महाराष्ट्र भूषण, शिक्षण महर्षी, माजी जेष्ठ मंत्री मा. डॉ. आण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या सामाजीक, शैक्षणीक, औद्योगिक व राजकीय कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. राज्यात आदर्शवत असणारी सूतगिरणी व शैक्षणीक संकुलात वाढ दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी रक्तदान शिबिरे व विविध वृक्षांचे रोपण हा सामाजीक उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. विविध संस्थाची उभारणी करित असताना त्याचे नेटके नियोजन व आदर्श कारभार वाखाणण्या जोगा आहे. असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा. श्री. मेहेंद्रआप्पा लाड यांनी व्यक्त केले. दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर मा. डॉ. आण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या ८८ व्या वाढ दिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण व रक्तदान शिबीर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.

प्रारंभी मा. श्री. महेंद्रआप्पा लाड, माजी आमदार भगवानराव साळुंखे, मा. अँड. बी. एस. पाटील (आण्णा), प्रा. डॉ. अरुण घोडके, माजी नगरसेवक श्री. अशोकराव पाटील (तात्या), माजी बांधकाम सभापती जगन्नाथराव माळी (आण्णा), राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा संघटक श्री. बाळासाहेब पाटील (बापू), संदीप विजभाऊ पाटील, माजी पंचायत समिती सदस्य श्री. नंदकुमार पाटील, शिवसेना सांगली जिल्हा उपप्रमुख श्री. नंदकिशोर निळकंठ यांच्या हस्ते वृक्षरोपण करणेत आले. रक्तदान शिबीराचे उदघाटन मा. श्री. महेंद्रआप्पा लाड व माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आले, यावेळी माजी आमदार मा. श्री. भगवानराव साळुंखे, मा. अँड. बी. एस. पाटील, प्रा. डॉ. अरुण घोडके, प्राचार्य विश्वास सायनाकर, रयत क्रांती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. सागरभाऊ खोत, कॉग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनिषाताई रोटे, लोकराज्य विद्या फौंडेशनचे डॉ. चंद्रशेखर तांदळे यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मा. श्री. बाळासाहेब पाटील, दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे संचालक मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. संभाजीराव कचरे (आबा), माजी नगरसेवक श्री. शहाजीबापू पाटील, माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या इस्लामपूर शहराध्यक्षा सौ. पुष्पलता खरात, माजी नगराध्यक्ष श्री. आनंदराव मलगुंडे, श्री. सुभाषभाऊ सुर्यवंशी, मार्केट कमिटीचे संचालक श्री. सी.एच. पाटील, श्री. विकासराव नांगरे, श्री. अनिल पावणे, य.मो. कृष्णा सह. साखर कारखान्याचे संचालक श्री. अविनाश खरात, शिवसेना वाळवा तालुका प्रमुख सागर मलगुंडे, प्रकाश कनप, किसान उद्योग समुहाचे संस्थापक मा. श्री. अशोकराव देसाई, सुनिल मलगुंडे, व्ही.टी. पाटील, अशोकराव पाटील, अभिजित रासकर, अर्जुन धोत्रे, अशोकराव बारपठे, धनपाल माळी, भानुदास मोटे, अदिनाथ कपाळे, रोहन बाबर, सुजित डाळे, शांतीसागर कांबळे, संदीप माने, राजेंद्र गावडे, माणीक पाटील, गणपती वाटेगांवकर, श्री. दत्तात्रय पवार (काका), संग्राम माने, वाघवाडीचे माजी सरपंच राजाराम लाड, मानसिंगराव वाघ, दिनकरराव पाटील, यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.प्रमुख पाहूणे व मान्यवरांचा सत्कार सूतगिरणीचे चेअरमन श्री. अमोल चौधरी, एम. एन. कांबळे, सुमंत महाजन, रमेश वडे, राजेंद्र लोंढे, मंगश लवटे, उमेश गावडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व फेटा देवून करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तावीक सूतगिरणीचे संचालक बाळासाहेब खैरे यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व संयोजन बजरंग कदम यांनी केले शेवटी आभार संचालक प्रकाश बिरजे यांनी मानले.

वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन एस. आय. मेत्री, मंगेश लवटे, विलास फाटक, यांनी केले, रक्तदान शिबीराचे संयोजन लेबर ऑफीसर अदित्य यादव, डी. एस. पाटील, मॅनेजर आनंदराव मिठारी, श्री. एच. आर. पाटील, प्रशांत जाधव, संतोष माने, विजय कवठेकर, संजय कुशिरे, संजय ताटे यांनी केले, सत्कार समारंभ नियोजन प्रकाश दगडे, अभिजित बारपटे, विजय पाटील यांनी तर वाढदिवस कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनरल मॅनेजर श्री . व्हि. एस. देशमुख, फायनान्स मॅनेजर श्री. आर. एस. मिरजे व प्रोडक्षण मॅनेजर श्री. सुर्यकांत देसाई यांनी विशेष परिश्रम केले, राजारामबापू रक्तपेढी मार्फत रक्त संकलनाचे काम करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते, अधिकारी व कामगार यांनी उत्सपूर्तपणे रक्तदान केले कार्यस्थळावर एकूण १०९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. नारळ, चिक्कु, आंबा, साग, वड, पिंपळ व आयुर्वेदीक वनस्पतींचे वृक्षारोपण कार्यस्थळावर व शैक्षणिक संकुलात करण्यात आले.मा. डॉ. आण्णासाहेब डांगे (आप्पा) यांना ८८ व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे खासदार, आमदार, विविध राजकिय पक्षांचे प्रदेश अध्यक्ष, राज्यपदाधिकारी, विविध संघटनांचे प्रमुख, समाज बांधव अशा राज्यभरातुन हजारो मान्यवरांनी दूरध्वनीवरून तसेच अनेकांनी पंढरपूर येथे प्रत्यक्ष भेटून वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...