छत्रपती संभाजीनगरराज्य मुख्याध्यापक संघाच्या विभागीय अध्यक्ष पदी डी.सी.डुकरे

राज्य मुख्याध्यापक संघाच्या विभागीय अध्यक्ष पदी डी.सी.डुकरे

spot_img

संभाजीनगर : ११ फेब्रुवारी २०२४, रविवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथील आयोजित बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ कार्यकारिणीची निवड करण्यात आली. राज्य अध्यक्ष म्हणुन मा.युनूस पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणुन मा.एस. बी. शिरसाठ ( नासिक ) मा. व्ही. एम. भताणे ( पुणे ), कार्याध्यक्ष म्हणुन मा.मनोज पाटील, राज्य सचिव म्हणुन मा. किरण मास्ट यांची तर सहसचिव म्हणुन मा. पी. एम. पवार, कोषाध्यक्ष म्हणुन मा.उदय देशमुख ( नागपूर ) यांची एकमताने निवड झाली. इतर राज्य सदस्यांची सुद्धा एकमताने निवड करण्यात आली. तसेच सहा विभागीय अध्यक्ष व सचिव यांची पण निवड करण्यात आली. मराठवाडा अध्यक्ष म्हणुन मा.डी. सी. डुकरे, कार्याध्यक्ष म्हणुन मा.बी. बी. नालमवार तर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणुन मा.एस. बी. शिरसाठ व सचिव म्हणुन खामकर यांची निवड झाली. राज्यस्तरीय महिला आघाडी राज्यअध्यक्षा म्हणुन मा.संध्या काळकर, मा. संजीवनी शेळके (बुलढाणा) यांची उपाध्यक्षा तर कार्याध्यक्षा म्हणुन मा.छाया मोहितकर यांची निवड झाली. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष म्हणुन सुनील जाधव, उपाध्यक्ष म्हणुन सुरेखा शिंदे, श्रीमंगले सर, सचिव धनपाल खोकड सर सह सचिव वाघ सर,यांची एकमताने निवड झाली. शहराध्यक्षा म्हणून श्रीमती सुलभा वट्टमवार यांची निवड झाली. या प्रसंगी मा. मनोहर पा.सुरगडे, विखारुद्दीन बाबु, सुनील पाटील, राजु महाजन, पी. पी.पाटील, योगेश आव्हाळे, सुजाता पवार, मंगला निकाळजे, अंजली दलाल ,लता शिंदे, बनबरे मॅडम, साठे मॅडम, निता कांबळे, लिपाने सर,कहाटेसर, गिरधर खंडागळे,व्ही झेड शेख, कांबळेसर,शफिक शेख, महमद शाकेर, डी. टी. मोरे, राठोड सर, सोनवणे सर,दुगाने सर, रणवीर सर, शिवाजी वायाळ सर यांच्यासह अनेक मान्यवर मुख्याध्यापक उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...