बीडचलो बीड : ११ फेब्रुवारी रोजी धनगर आरक्षण अंमलबजावणी इशारा मेळाव्याचे...

चलो बीड : ११ फेब्रुवारी रोजी धनगर आरक्षण अंमलबजावणी इशारा मेळाव्याचे आयोजन

spot_img

बीड : धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी ११ फेब्रुवारी रोजी बीड येथे धनगर आरक्षण अंमलबजावणी इशारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालासाहेब दोडतले व प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी अंबाजोगाईत रविवारी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

मागील अनेक वर्षांपासून धनगर समाज बांधव लढा देत आहेत. याप्रश्नी विविध माध्यमांतून यशवंत सेनेच्या वतीने सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच आहेत, याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून यशवंत सेनेच्या वतीने अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालासाहेब दोडतले व प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी सांगितले की, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाने सातत्याने विविध प्रकारची अनेक आंदोलने करून ही महाराष्ट्र राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षण मागणी संदर्भात उदासीन आहे.

सरकारने १५ फेब्रुवारी पर्यंत धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे हा अंतिम इशारा देण्यासाठी बी.के. कोकरे प्रणित यशवंत सेनेच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी बीड येथे धनगर आरक्षण अमलबजावणी इशारा मेळाव्याचे आयोजन केले आहे. तसेच धनगर समाजाच्या घटनात्मक मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी दिनांक २२ फेब्रुवारी पासून यशवंत सेनेच्या वतीने मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहोत. आझाद मैदानावर उपोषणाला जाण्यापूर्वी श्रीक्षेत्र चौंडी येथून धनगर आरक्षण दिंडी काढण्यात येणार आहे. तसा निर्धार आम्ही केला आहे. अशी माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालासाहेब दोडतले व प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

तरी या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...