नाशिकधनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

spot_img

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या मागणीसाठी निफाड येथे रुद्राय हॉटेलच्या हॉल मध्ये नाशिक जिल्ह्यातील धनगर समाजाचे मान्यवर पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक धनगर समाजाचे जेष्ठ नेते नाशिक जिल्हा दुध संघाचे माजी चेअरमन व निफाड विविध कार्यकारी विकास सेवा संस्थेचे विद्यमान चेअरमन माननीय शिवाजीराव ढेपले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली

मागच्या अडीच वर्षाच्या काळात धनगर समाजाला प्रतिनिधित्व नसल्यामुळे समाज नाराज होता. तसेच आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वाट्याला कधीच विधानपरिषद आली नाही. याचा सर्व पक्षांनी विचार करावा अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे महामंडळावर, शासकीय कमीट्यांवर नाशिक जिल्ह्यातील धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी. भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समाजाला तिकीटे मिळावी. त्याचप्रमाणे धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी.
समाजाला मेंढपाळ व्यवसायाच्या निमित्ताने भटकंती करावी लागु नये म्हणून मुक्त गोठ्यात लवकर वजनदार होणाऱ्या शेळी मेंढीच्या जाती विकसित कराव्या.
पारंपरिक व्यवसायामुळे मुलाबाळांच्या शिक्षणाची हेळसांड होते.म्हणून मोफत दर्जेदार शिक्षण व व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज अशा अनेक मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विविध पक्षाच्या वतीने धनगर समाजाचे सात आमदार निवडून आले.आमदार दत्ता मामा भरणे इंदापूरमधुन राष्ट्रवादी पक्ष अजित पवार, जत मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर भा.ज.प., माळशिरस मतदारसंघात आमदार ऊत्तमराव जानकर राष्ट्रवादी पक्ष शरदराव पवार, करमाळा मतदारसंघात नारायण आबा पाटील राष्ट्रवादी शरदराव पवार, सांगोला मतदारसंघात शे.का.प.तर्फे बाबासाहेब देशमुख, फलटण मतदारसंघात आमदार सचिन पाटील राष्ट्रवादीअजित पवार, तर दर्यापूर मतदार संघात गजानन लवटे शिवसेना ऊबाठा गट असे एकुण सात आमदार निवडून आले आहेत. पैकी सत्ताधारी पक्षांकडुन तीन मंत्रीपदे व नाशिक जिल्हा शिवसेना अध्यक्ष भाऊलाल तांबडे यांना शिंदे शिवसेनेच्या कोठ्यातुन विधानपरिषद आमदार करावे अशी मागणी करण्यात आली. यासाठी नाशिक जिल्ह्यातील धनगर समाजाचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री व दोन्हीही ऊपमुख्यत्र्यांना भेटणार आहे. याप्रसंगी समाजनेते बापूसाहेब शिंदे, नवनाथ ढगे, सेवानिवृत्त डेप्युटी कलेक्टर देवीदास चौधरी, मनमाड मार्केट कमीटीचे चेअरमन गंगाधर बिडगर,शिक्षक नेते आनंदराव कांदळकर, वकील पुण्यश्लोक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब ओहोळ, सुरेश आगवणे,गोरख गाढे,सुरेश पल्हाळ,रामनाथ पल्हाळ, भाऊसाहेब सैंद्रे, मालेगाव पंचायत समितीचे सदस्य नंदुकाका शिरोळे, येवला मार्केट कमीटीचे ऊपसभापती गणपत कांदळकर, येवला पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव साळवे, अहिल्यादेवी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष महेंद्र दुकळे,चांदवड मार्केट कमीटीचे संचालक विक्रम बाबा मार्कंड, येवला खरेदी विक्री संघाचे संचालक दत्तु देवरे, शांतीलाल सोनी पतसंस्थेचे संचालक भास्करराव ढेपले,निफाड खरेदी विक्री संघाचे संचालक भाऊसाहेब मोरे, विंचुर सोसायटी चे चेअरमन बापुसाहेब सोदक, माणिक देवकर, परसराम घोडे, राजाभाऊ घोडे, चारुदत्त आढाव,शरद ढेपले आदीसह अनेक मान्यवर,विविध संस्थांचे पदाधिकारी ऊपस्थित होते.
सुत्रसंचालन माणकेश्वर वाचनालयाचे संचालक सुनील चिखले यांनी केले.
आभार प्रदर्शन रतन हिरे यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...

डॉ. शरद गलांडे यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्काराने सन्मानित

पुणे : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानी ...