ब्रेकिंगराज्य सरकारकडून धनगर समाजाची घोर निराशा, आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ST आरक्षण अंमलबजावणीचा...

राज्य सरकारकडून धनगर समाजाची घोर निराशा, आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ST आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय नाही

spot_img

मुंबई : आज किंवा उद्या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची शक्यतो शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत निर्णयांचा धडाका पाहायला मिळाला. मात्र धनगर समाजाच्या हक्काच्या ST आरक्षण अंमलबजावणी बाबत निर्णय न घेतल्याने राज्य सरकारकडून धनगर समाजाची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होताना दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी राज्य सरकारने धनगर समाजाच्या हक्काच्या ST आरक्षण अंमलबजावणी बाबत सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी मुंबईत धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून आंदोलने, उपोषणे केली. याबाबत निर्णय न घेतल्याने निषेध व्यक्त होताना दिसून येत आहे. शिवाय पुढच्याच महिन्यात होणार्‍या निवडणुकीत या सरकारमधील लोकांना घरी बसवण्याचा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.

डॉ. सुधाकर शिंदे समितीने सादर केलेला अहवाल, शेकडो आंदोलने, प्रचंड पाठपुरावा यासह प्रचंड अपेक्षेने धनगर समाजातील विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर गर्दी केली आहे.

मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 19 निर्णय

1.मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ, आज रात्री 12 पासून अंमलबजावणी

2.आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)

3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

4.दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)

5.आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)

6.वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

7.राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)

8.पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)

9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)

10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) 2.0 राबविणार

11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)

12.लकिल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)

13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)

14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)

15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)

16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)

17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट

18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)

19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...