पंढरपूर : पंढरपूर येथे सुरू असलेले धनगर समाजाच्या उपोषणाच्या अनुषंगाने धनगर समाजातील लोकप्रतिनिधी पंढरपुरात बैठक झाली यावेळी जोपर्यंत राज्य सरकार धनगर समाजाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत खालील प्रमाणे कार्यक्रम धनगर समाजाने राबवावेत. असे सर्वानुमते निश्चित करण्यात आले.
1) दिनांक 21 /9 /2024 रोजी पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावात धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी धनगर समाज उपोषणास पाठिंबाचे डिजिटल बोर्ड लावावेत तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोर्ड लावावेत.
2) दिनांक 22/9/2024 रोजी आपापल्या मतदारसंघातील खासदार ,आमदार यांच्या घरासमोर जाऊन हालगी वादन करून त्यांना धनगर समाजास पाठिंबा आहे अशा प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून एक पत्र घ्यावे.
3) दिनांक 23/9 /2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी आपापले तालुक्याच्या ठिकाणी मुख्य महामार्गावर रस्ता रोको करायचा आहे.
4) दिनांक 24 /9 /2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांनी टिळक स्मारक पंढरपूर येथे निर्धार मेळावा आयोजित केला आहे त्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे उपोषणकर्ते माऊली हरणावळ, दीपक बोराडे विजय तमनर , गणेश केसकर, योगेश धरम, यशवंतराव गायके व संयोजन समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.