पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरिक्षक परीक्षेचा अंतिम निकाल पूर्वीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या परीक्षेत दिवड (ता. माण. जि. सातारा) येथील अमोल भैरवनाथ घुटुकडे याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत पोलीस उपनिरीक्षक पदास गवसणी घातली आहे. तर NT C प्रवर्गातील मुलींमधून वृषाली ठोंबरे हिने राज्यांत प्रथम क्रमांक पटकावला आहे.सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी जवळपास 615 पदांसाठी 1298 जणांची असून यामध्ये धनगर समाजाच्या (NT C ) 111 जणांनी बाजी मारली आहे. यामध्ये 18 मुलींचा समावेश आहे. सर्वच उमेदवार त्यांचे पालक, नातेवाईक व हितचिंतक हे अंतिम निकालाची वाट पाहताना दिसत आहेत.