मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवेचा निकाल जाहिर झाला असून निकालात सचिन कानिफनाथ कोळेकर सह १४ जणांची नगरपरिषद प्रशासन संचालनालयात लेखापरीक्षण व लेखा सेवा अधिकारी या पदावर निवड झाली आहे.
एकूण २०४ पदांपैकी शिवाजी खरात, प्रणाली जाडकर, मेघा जानकर, यांनी खुल्या वर्गातून निवड झाली तर संकेत लांडगे, शेखर आटोळे, सचिन कोळेकर, महेश कोकळे, बाळासाहेब वडीतके, दत्तात्रेय पांडुळे, हिराराम डोमाळे, आरती सनगर, सारिका ढेपळे, अनिता कोकरे, सचिन ढेरे याची भटक्या जमाती क या राखीव प्रवर्गातून निवड झाली आहे.
निवड झालेल्या सर्व अधिकार्यांचे धनगर माझाचे संपादक व पुण्यश्लोक फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी अभिनंदन केले आहे.
सचिन कोळेकर पुण्यातील नामांकित व्ही.आय .आय .टी. इंजिनिअरिंग कॉलेज,पुणे इलेक्ट्रोनिक्स शाखेचे व कोल्हार येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथील माजी विद्यार्थी आहेत. सचिनने मिळवलेल्या खडतर यशाच्या निकालाने कोल्हार बु. व त्यांचे मूळ गाव हजारवडी (पानोडी) येथील नागरिक, शिक्षक व पालक यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे.