महाराष्ट्रचलो पंढरपूर : २० सप्टेंबर रोजी पंढरपुरात धनगर समाजाची राज्यस्तरीय बैठक

चलो पंढरपूर : २० सप्टेंबर रोजी पंढरपुरात धनगर समाजाची राज्यस्तरीय बैठक

spot_img

पंढरपूर : धनगर समाजाच्या हक्काच्या एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या दहाव्या दिवशी आंदोलकांची प्रकृती ढासळत चालली आहे. सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व अंतिम निर्णय घेण्यासाठी राज्यभरातील धनगर समाजाची बैठक शुक्रवारी (दि. २०) पंढरपुरात घेण्यात येणार आहे. या बैठकीस धनगर समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून उपोषण चालू असुन राज्य सरकार योग्य मार्ग काढत नसून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी फक्त झुलवत आहे. त्यामुळे राज्यातील विविध पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेणार आहेत.

तरी उपोषणकर्त्यांच बळ वाढवण्यासाठी पंढरपूर, जवळपास गावातून तसेच राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपोषणकरते व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...