नाशिकचेअरमन शिवाजीराव ढेपले यांना सहकार व समाजकारणात विशेष कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान

चेअरमन शिवाजीराव ढेपले यांना सहकार व समाजकारणात विशेष कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान

spot_img

नाशिक : केद्राई कृषी व ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने  महाराष्ट्र राज्यातील शेकर्‍यांसाठी ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध क्षेत्रात ऊल्लेखणीय काम करणाऱ्या शेतकरी व मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये निफाड विविध कार्यकारी विकास सेवा संस्थेचे चेअरमन शिवाजीराव ढेपले यांना सहकार व समाजकारणात विशेष कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम  चांदोरी येथील काकाश्री लॉन्स येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

      याप्रसंगी ऊस पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे  शास्त्रज्ञ डॉ. भारत रासकर साहेब, त्याचप्रमाणे नेटाफीम ईरीगेशनचे ऊस विकास प्रकल्प विभागाचे ऊपव्यवस्थापक व ऊसतज्ञ माननीय डॉ. अरुण देशमुख साहेब सह डेबॉन्स ऑग्रोचे पवन जोशी, लासलगाव मार्केट कमीटीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर, अशोक बनकर पतसंस्थेचे अध्यक्ष  रामभाऊ माळोदे, एकरी शंभर टन ऊस ऊत्पादक बाळासाहेब पाटील कोगे कोल्हापूर, साखर ऊद्योग तज्ञ राजेंद्र पाटील कोल्हापूर, राजेश्वर राजुरकर चंद्रपूर,पुरस्कारार्थी पत्रकार सागर निकाळे,योगेश बिडवई, विश्वनाथ कारे,मोतीराम मोगल, डॉ. हेमंत दिक्षीत, चेतना सेवक, पिंपळगांव मार्केट कमीटीचे माजी संचालक साहेबराव खालकर, पुण्यश्लोक संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब ओहोळ, माणकेश्वर वाचनालयाचे संचालक सुनील चिखले,चंद्रशेखर गावले,  केद्राई संस्थेचे पदाधिकारी यासह अनेक मान्यवर व ऊस ऊत्पादक ऊपस्थित होते.

                        याप्रसंगी केद्राई कृषी व ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष यांनी संस्थेच्या कामाबद्दल माहिती दिली. बोलतांना म्हणाले की,दरवर्षी आमची संस्था  संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देते. त्यांची प्रेरणा घेऊन आजपर्यंत अनेक तरुण घडले.त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

 शिवाजीराव ढेपलेंसारखी कर्तृत्ववान माणसं आमच्या नजरेतुन सुटली नाही. 

         शिवाजीराव ढेपलेंना सहकाराचा गाढा अभ्यास आहे. त्याचबरोबर समाजकारणाची फार आवड आहे. असे व्यक्तीमत्व घडण्यासाठी फार खस्ता खाव्या लागतात. खरंतर अशी माणसं समाजासाठी दीपस्तंभ असतात. “माणूस प्यारा नसुन त्याचे काम प्यारे असते”. त्यांच्या कार्याचा यानिमित्ताने गौरव होणं हि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

        सत्काराला ऊत्तर देतांना शिवाजी ढेपले म्हणाले कि, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसुन मला घडविण्यासाठी अनेक हात कामी आले.त्या सर्वांचा हा सन्मान आहे.

         अशा पुरस्कारातून कर्तृत्ववान पिढी घडावी. समाजाचे त्यातून हित व्हावे. समाजात अनेक “झाकलेले माणिक” असतात. त्यांना समाजापुढे आणण्याचे काम आपल्या संस्थेने केले त्याबद्दल  पुरस्कारार्थीच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो. मी आपला सदैव ऋणी राहील. असेही ते म्हणाले.

            याप्रसंगी  निफाडचे आमदार दिलीप काका बनकर, निफाडचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, ऊपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे,वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, साहित्यिक व कवी विवेक ऊगलमुगले,कवी संजय आहेर सर,कवी राजेंद्र सोमवंशी सर आदींनी ढेपले यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...