This Content Is Only For Subscribers
पुणे : कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज, बुधवारी सायंकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला. पुणे येथे ते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक म्हणून ते काम पहात होते. तर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची येडगे यांच्या जागेवर बदली झाली.
अमोल येडगे हे २०१४ च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून यापूर्वी त्यांनी अमरावती येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे तसेच त्यांनी कळमनुरी (जि. हिंगोली) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. तसेच आयटीडीपीचे प्रकल्प संचालक म्हणूनही काम केले आहे. बीडमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.
उत्कृष्ठ प्रशासन चालविणारे अधिकारी म्हणू त्यांची राज्यात ओळख आहे. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील कराड जवळील मलकापूर येथील रहिवाशी आहेत.