नवी दिल्ली : भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांची AIIMS नागपूरच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. माजी राज्यसभा खासदार आणि सामाजिक आरोग्य सेवेतील अनुभवी, डॉ. महात्मे त्यांच्या नवीन भूमिकेसाठी तत्पर आहेत. डॉ. महात्मे यांची अध्यक्षपदी नियुक्ती ही AIIMS नागपूरसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. रुग्णसेवेसाठी त्यांची बांधिलकी आणि आरोग्यसेवेतील त्यांचा व्यापक अनुभव संस्थेच्या ध्येयाला पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
”स्थानिक व्यक्ती येथील प्रश्न जास्त चांगल्या प्रकारे समजू शकते. मी या नवीन जबाबदारीची आतुरतेने वाट पाहत आहे आणि या नव्या भूमिकेसाठी मी माझे संपूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करेन. या नेमणुकीबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुखभाई मांडविया, नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस यांचा मी मनापासून आभारी आहे”, असे डॉ विकास महात्मे म्हणाले.
गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक आरोग्य, त्यासाठी पॅरामेडिक्सचे सक्षमीकरण यासाठी डॉक्टर महात्मे कार्यरत आहेत. ‘रुग्ण किंवा पेशंट सर्वोच्च’ हे त्यांचे ब्रीदवाक्य AIIMS नागपूर तर्फे ही समाजासाठी फायदेशीर ठरेल. डॉ महात्मे यांचे कौशल्य आणि समाजाप्रती असलेली वचनाबद्धता यामुळे AIIMS नागपूर मधील सेवांचा दर्जा वाढवण्यास निश्चितच मदत होईल.
धनगर माझा परिवाराच्या वतीने संपादक धनंजय तानले यांनी अभिनंदन केले आहे.