बुलढाणारात्रीच्या वेळी मेंढपाळ कुटुंबावर प्राणघातक हल्ला

रात्रीच्या वेळी मेंढपाळ कुटुंबावर प्राणघातक हल्ला

spot_img

बुलढाणा : आठ जणांनी रात्रीच्या वेळी एका मेंढपाळ कुटुंबावर प्राणघातक हल्ला करून तीन जणांना गंभीर जखमी केले. ही घटना १७ मार्च रोजी रात्री मेरा बुद्रुक शिवारातील शिंदी येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.मेरा बु. शिवारातील शिंदी येथील संजाबराव हाडे यांच्या शेतात घडलेल्या या घटनेप्रकरणी रेखा गजानन शिगडे (३५, रा. गणेशपूर, ता. खामगाव) या मेंढपाळ महिलेने अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संबंधित मेंढपाळ कुटुंब हे चार ते पाचमहिने वेगवेगळ्या गावांच्या शिवारात मेंढ्या चारण्यासाठी घेऊन जात असतात. तसेच, काहींच्या शेतात मुक्कामी राहून उदरनिर्वाह करतात. १७ मार्च रोजी हे मेंढपाळ कुटुंब संजाबराव हाडे यांच्या मेरा बुद्रुक शिवारातील शेतात होते. रात्री आठ वाजता त्यांनी मेंढ्या बांधल्या. त्यावेळी अचानक एकनाथ चिमाजी लष्कर, सोनू ऊर्फ अनंता एकनाथ लष्कर (रा. शिंदी) यांनी वाडग्यावर येत पती गजानन साहेबराव शिंगाडे यांना गावामध्ये मेंढ्या चारण्यास मनाई केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.दरम्यान, आम्ही तुमच्या शेतात पायही ठेवणार नाही असे लष्कर यांना सांगण्यात आले. तेव्हा सोनू ऊर्फअनंता एकनाथ लष्कर (रा. शिंदी) यांनी पतीस शिवीगाळ केली. एकनाथ चिमाजी लष्कर यांनीही मारहाण केली. अनोळखी पाच ते सहा जणांनीही जबर मारहाण केल्याचे महिलने तक्रारीत म्हटले. सोबतच आपणासही मारहाण केल्याचे म्हटले आहे.मुलगा महेंद्र गजानन शिंगाडेलाही यात मारहाण झाली. गंभीर जखमींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी एकनाथ चिमाजी लष्कर, सोनू उर्फ अनंता लष्कर व अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मारहाण प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलिस करत आहेत

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...