पिंपरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेजवळ असलेल्या मोरवाडी चौकातील स्मारकासमोर सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा प्रेरणादायी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय तानले व राजू दुर्गे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. यावेळी समितीचे सदस्य सूर्यकांत गोपने, गणेश खरात, बंडू मार्कड, मनोज मार्कड, राजेंद्र घोडके, महावीर काळे, अजय दूधभाते, सुनील बनसोडे संजय नाईकवाडी, यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात आरेवाडी येथील धनगरी गुज नृत्य व रक्तदान शिबिर कार्यक्रमाने होणार आहे. त्यानंतर दहा वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त व शहरातील विविध पक्ष संघटना व संस्था यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या शुभहस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
प्रति वर्षाप्रमाणे पुण्यश्लोक याहि वर्षी पु. अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार यावर्षी कामगार नेते बाबासाहेब कांबळे यांना पद्मश्री गिरीश जी प्रभुणे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे तसेच यावेळी चिन्मय मुळये यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी यांच्या जीवनावर लिहिलेले इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे तसेच विद्यार्थी दत्तक योजना राबविण्याचा संकल्प जाहीर करण्यात येणार आहे.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची यशोगाथा व सर्व राष्ट्रीय महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. तसेच या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
तरी पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान समितीच्या वतीने पल्लवी मार्कड, सोनाताई गडदे, आशाताई काळे, सुवर्णा सोनवलकर, रेखा दूधभाते, बाबीर मेटकरी, संतोष पांढरे, संजय कवितके, सह इतर सदस्यांनी केले आहे.