
मुंबई (धनगर माझा) : सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेनं जारी केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसातील राज्यातील कार्यालयीन मूल्यमापन जाहिर केले त्यानुसार100 दिवसात सर्वोत्तम पोलीस अधिक्षक म्हणून कामगिरी करणाऱ्या ५ अधिकाऱ्यांमध्ये मा. बाळासाहेब वाघमोडे पाटील, पोलीस अधिक्षक, पालघर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच 100 दिवसात सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून कामगिरी करणाऱ्या ५ अधिकाऱ्यांमध्ये मा. अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला..तर 100 दिवसात सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामगिरी करणाऱ्या ५ अधिकाऱ्यांमध्ये मा. रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ठाणे जिल्हा परिषद यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
त्यांच्या या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल यांच्यावर अभिनंदनचा वर्ष होताना दिसून येत आहे.धनगर माझा परिवाराच्या वतीने जाहिर अभिनंदन करण्यात येत आहे.