अहिल्यानगरलवकरच जीआर- राज्यभरातील मुलींच्या वस्तीगृहांना अहिल्यादेवींचे नाव व अहिल्याबाई नव्हे आता अहिल्यादेवी...

लवकरच जीआर- राज्यभरातील मुलींच्या वस्तीगृहांना अहिल्यादेवींचे नाव व अहिल्याबाई नव्हे आता अहिल्यादेवी : मुख्यमंत्र्यांची घोषणा

spot_img

अहिल्यानगर : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत आहे. त्यामुळे राज्यभरातील मुलींच्या वस्तीगृहांना अहिल्यादेवींचे नाव दिले जाईल. तर सर्व सरकारी दस्तावेजांमध्ये अहिल्याबाई ऐवजी ‘अहिल्यादेवी’ असा उल्लेख केला जाईल, या संदर्भातील शासन निर्णय (GR) लवकरच काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी चौंडी येथे केली. तसेच धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाईल असेही ते म्हणाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९९ जयंती उत्सव चौंडी येथे साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री अतुल सावे, मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार संजय शिरसाट, आमदार श्रीमती मोनिकताई राजळे, अण्णासाहेब डांगे, दत्तात्रय भरणे, सुरेश धस, राम शिंदे, गोपीचंद पडळकर मा. आ. रामहारी रूपणवर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

आदिवासी समाजाच्या २२ योजनांचा लाभ धनगर समाजाला दिला जात आहे. धनगर समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करता यावेत यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे धर्तीवर स्वतंत्र महामंडळ सुरू केले जाणार आहे. पुढील वर्षी अहिल्यादेवींचा त्रिशताब्दी जन्मोत्सव राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात साजरा केला जाईल. धनगर समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करता यावेत यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे धर्तीवर स्वतंत्र महामंडळ सुरू केले जाणार आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

यावेळी आठवले, अण्णा डांगे व पडळकर यांची भाषणे झाली. धनगर आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे पडळकर यांनी जाहीर केले. सुभेदार मल्हारराव होळकर यांचे स्मारक करण्याची मागणीही त्यांनी केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष आ. राम शिंदे यांनी यांनी केले.

.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...